छत्रपती संभाजीनगर : शाळा सुरु झाल्या की रोज मुलांना डब्यात काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. रोज रोज पोळी भाजी खाऊन देखील मुलांना कंटाळा येतो. पण डब्यात काहीतरी तुम्हाला हेल्दी द्यायचं असेल आणि ते चविष्ट देखील पाहिजे असेल तर तुम्ही सोयाबीनचा पराठा करू शकता. या पराठ्यामुळे मुलांना भरपूर असं प्रोटीन देखील भेटत आणि त्यांच्या वाढीसाठी देखील चांगला असतं. तर सोयाबीनचा पराठा कसा करायचा? याची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगर मधील प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
सोयाबीन पराठ्यासाठी लागणार साहित्य
एक वाटी गव्हाचे पीठ, सोयाबीनच्या वड्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, लसूण, साजूक तूप, पिझ्झा पास्ता मसाला हे साहित्य लागेल.
आता ब्रेडशिवाय बनवा हेल्दी सँडविच, रव्याची सोपी रेसिपी माहितीये का?
सोयाबीनचा पराठा बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं. त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं. ते एकत्र करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी टाकून मऊसुत असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा थोडा वेळ बाजूला ठेवायचा. सोयाबीनच्या वड्या या दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. त्यानंतर ह्या वड्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकून या वड्या बारीक करून घ्यायच्या. आता या बारीक झालेल्या वड्यामध्ये तुम्ही तिखट, लसूण, मीठ, पिझ्झा, पास्ता, मसाला, कोथिंबीर टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
आता तयार केलेल्या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची. त्यामध्ये हे सोयाबीनच्या वड्याचं मिश्रण टाकायचं आणि व्यवस्थित असं हा पराठा लाटून घ्यायचा. तव्यावर पराठा टाकण्याआधी थोडसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित असाच चांगला हा पराठा भाजून घ्यायचा. पराठा भाजत असतानाच त्यावरती थोडसं तूप टाकून भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हा सोयाबीनचा पराठा बनवून तयार होतो. तुम्ही हा मुलांना टोमॅटो केचप सोबत खायला देऊ शकता. तर अगदी झटपट असा दहा मिनिटांमध्ये हा सोयाबीनचा पराठा बनवून तयार होतो. तर तुमच्या मुलांना नक्की टिफिनमध्ये हा पराठा तुम्ही द्या नक्कीच त्यांना आवडेल.