आता ब्रेडशिवाय बनवा हेल्दी सँडविच, रव्याची सोपी रेसिपी माहितीये का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आता ब्रेडशिवाय घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं रव्याचा सँडविच बनवता येतो. संपूर्ण रेसपी Video इथं पाहा.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : रोज मुलांना डब्यात काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. रोज पोळी भाजी खाऊन देखील मुलांना कंटाळा येतो. पण डब्यात काहीतरी हेल्दी द्यायचं असेल आणि ते चविष्ट देखील पाहिजे असेल तर तुम्ही घरच्या घरी विना ब्रेडचं सँडविच करू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी रवा सँडविच बनवता येतं. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
रवा सँडविच साठी लागणारे साहित्य
एक वाटी बारीक रवा, एक वाटी दही, एक चीज स्लाईस, एक वाटी पाणी, थोडासा इनो, चवीनुसार मीठ, छोट्या आकाराच्या बटाट्याचा कीस, एका गाजरचा कीस, थोडीशी पत्ता कोबी, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर हे साहित्य रवा सँडविच बनवण्यासाठी लागेल.
advertisement
रवा सँडविच बनवायचा कसा?
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी रवा आणि एक वाटी दही एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून एक वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं. साधारण दहा मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवून द्यायचं. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व टाकायच्या. सर्वप्रथम अद्रक लसणाची पेस्ट बटाट्याचा कीस, गाजराचा कीस, बारीक चिरलेली पत्ता कोबी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा इनो टाकायचा आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
advertisement
तयार झालेला मिश्रणाचा सँडविच तुम्ही तव्यावर देखील करू शकता. सँडविच मेकरमध्ये देखील सँडविच बनवू शकता. सर्वप्रथम तव्याला तेल लावून घ्यायचं. त्यावरती हे मिश्रण टाकायचं. त्याच्यावरती चीज स्लाईस टाकायचे आणि वरतून परत हे मिश्रण टाकून हे चांगलं कुक करून घ्यायचं. बाजूने थोडसं तूप टाकून परत चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने हे रव्याचं चीज सँडविच तयार होतं. हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करू शकता.
advertisement
मुलांना घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं विना ब्रेडचा हेल्दी सँडविच बनवून देता येतो. आपणही ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 13, 2024 8:26 PM IST