अमरावती : उन्हाळ्यात कैरीची आवक सुरू होते. त्यानंतर कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. थंड पेय म्हणून कैरीचे सरबत, पन्ह, आमरस हे सर्व पदार्थ बनवले जातात. यातील आवर्जून बनवले जाणारे पेय म्हणजे कैरीचे पन्ह. कैरीचे पन्ह पिल्याने शरीर हायड्रेट राहते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर उष्णतेपासून आराम मिळतो, असे आपले आजी- आजोबा सांगतात. कारण त्यांनीच आपल्या पिढीपर्यंत आणलेला हा पदार्थ आहे. त्यांच्या काळात आंबा चुलीमध्ये शिजवून आणि त्यात फक्त गुळ आणि मीठ टाकून पन्ह बनवले जात होते. तुम्हाला सुद्धा कैरीचे पन्ह बनवायचे असेल तर त्याची रेसिपी अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.
advertisement
कैरीचे पन्ह बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शिजवलेली कैरी, गुळ, मीठ, साखर, विलायची आणि पुदिना हे साहित्य लागेल.
कैरीचे पन्ह बनवण्याची कृती
सर्वात आधी कैरी शिजवून घ्यायची. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने कैरीतील गर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. त्यासाठी मिक्सरमध्ये कैरीचा गर, गुळ, मीठ आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे.
दही सर्वजण खातात, पण कमी लोकांना माहित असते खाण्याची योग्य पद्धत, तुम्ही करू नका 'ही' चूक!
त्यानंतर एका ग्लासमध्ये 2 चमचे कैरीचा गर टाकून घ्यायचा. त्यानंतर बर्फाचा एखादा तुकडा टाकायचा. नसल्यास थंड पाणी सुद्धा चालेल. त्यानंतर मीठ किंवा साखर तुम्हाला लागत असल्यास तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर थंडगार पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आंबट गोड असे आरोग्यवर्धक कैरीचे पन्ह तयार होईल. त्यात तुम्ही वरून सुद्धा पुदिन्याचे पान टाकू शकता.
काही वर्षांपूर्वी आपले आजी आजोबा कैरीचे पन्ह हे गावरान पद्धतीने बनवत होते. कैरी चुलीत शिजवून त्याचा गर काढून त्यात फक्त गुळ आणि मीठ टाकायचे आणि तसेच पन्ह प्यायला घेत होते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा कैरीचे पन्ह. दुपारच्या वेळी शरिराला थंडावा देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.