पुणे : महाराष्ट्रात, भारतामध्ये अनेक प्रसिद्ध सण साजरे केले जातात. यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. या सणासाठी काळया रंगा सोबतच तीळ गुळाला देखील तितकंच महत्व आहे. या तीळ गुळाच्या माध्यमातून आपण गोडवा हा वाटच असतो. त्यामुळे मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू कशा पद्धतीने घरीच तयार करायचे याची रेसिपी पुण्यातील गृहिणी राणी शिंदे यांनी सांगितली आहे.
advertisement
तिळाचे लाडू साहित्य
कोणताही पदार्थ करायचा तर त्यासाठी साहित्य आलंच. तिळाचे लाडू करण्यासाठी घरातील साहित्य वापरू शकता. त्यासाठी 1 वाटी तीळ , 1 वाटी गूळ, साजूक तूप, विलायची पूड आणि शेंगदाण्याचा कुट हे साहित्य आवश्यक आहे.
संक्रांतीच्या वाणासाठी घरीच बनवा घेवर, पाहा सोपी रेसिपी, Video
लाडू बनवायचे कसे ?
सर्व प्रथम तीळ हे मंद आचेवर लालसर होई पर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर पाक तयार करून घ्यायचा. पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी पाण्यात टाकून बघायचा. त्याची गोळी तयार झाली की तो पाक व्यवस्थित तयार झाला आहे. पाकामध्ये तीळ टाकून घ्यायचे. त्यानंतर शेंदण्याचा कूट टाकायचा आणि चवी पुरती विलायची पूड टाकायची. हे सगळं मिश्रण छान एकत्रित परतून घ्यायचे. गरम आहे तो पर्यंत त्याचे छान असे लाडू वळून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू करू शकता, असं राणी शिंदे सांगतात.
70 रुपयांपासून मिळतायेत हलव्याचे दागिने, संक्रांतीसाठी पाहा भरपूर व्हरायटी, Video
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि मकर संक्रांतीला उखाणा घेऊन सणाच्या दिवशी तीळगूळ नक्की वाटप करा. त्यामुळे प्रत्येक जण हे लाडू बनवत असतो.