TRENDING:

हिवाळ्यात बनवा विदर्भ स्पेशल पाण्यातील गोळे, एकदम आवडीने खाल, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO

Last Updated:

विदर्भ अनेक झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एक म्हणजे पाण्यातील गोळे. हा पदार्थ घरगुती साहित्यापासून बनणारा आहे. तुम्ही कमीत कमी वेळात चटपटीत असे पाण्यातील गोळे बनवू शकता. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : विदर्भामध्ये हिवाळ्यात कढी गोळे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाण्यातील गोळे सुद्धा तितक्याच आवडीने बनवले जातात. हिवाळा सुरू झाला की पाण्यातील गोळे आणि भाकरी हा पदार्थ विदर्भात हमखास केला जातो. पाण्यातील गोळे हा पदार्थ कसा बनवायचा? याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.

पाण्यातील गोळे बनवण्यासाठी साहित्य

advertisement

1 वाटी तुरीची डाळ, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीचा ठेचा, कडीपत्ता, कोंथिबीर, लाल तिखट, हळद, धनी पावडर, मीठ, तेल, जिरे हे साहित्य लागेल.

हिवाळ्यात बनवा अमरावती स्पेशल सुरण कंदाची भाजी, आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, पाहा रेसिपी VIDEO

पाण्यातील गोळे बनवण्यासाठी कृती

सर्वात आधी तुरीची डाळ 2 ते 3 तास भिजत घालायची. त्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची आणि त्यात तेल घालायचे. त्यांनतर जिरे आणि कांदा घालायचा. कांदा लाल होऊ द्यायचा आणि त्यात लाल तिखट आणि इतर मसाले घालावे. ते थोडे शिजून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटो घालायचे आणि ते शिजवून घ्यायचे. त्यात कडीपत्ता सुद्धा घालू शकता.

advertisement

त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी घालायचे आणि रस्सा बनवून घ्यायचा. त्यानंतर त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तो पर्यंत गोळ्याचे सारण तयार करून घ्यायचे. बारीक करून घेतलेल्या डाळीमध्ये जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ हळद घालून घ्यायचं. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं. त्यात तुम्ही गोळे घट्ट होण्यासाठी पीठ किंवा बेसन घालू शकता. आता ते व्यवस्थित मिक्स करून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे.

advertisement

पाण्याला उकळी आली असेल तर त्यात गोळे सोडायचे. गोळे शिजतपर्यंत त्यात चमचा टाकायचा नाही. जेव्हा गोळे वर येतात तेव्हा ते शिजले म्हणून समजायचे. त्यानंतर त्यात कोथिंबीर घालून घ्यायची. पाण्यात गोळे तयार होतील. घरगुती साहित्यापासून अगदी सोपी रेसिपी तुम्ही बनवू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
हिवाळ्यात बनवा विदर्भ स्पेशल पाण्यातील गोळे, एकदम आवडीने खाल, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल