अमरावती: महाशिवरात्री, श्रावण सोमवार, एकादशी आणि बरेच उपवास वर्षभरात केले जातात. प्रत्येक उपवासाला काही न काही पथ्ये ही असतातच. काही वेळा तिखट खाता येत नाही तर काही वेळा गोड पदार्थ सेवन करता येत नाही. ज्या उपवासाला तिखट पदार्थ खाऊ शकत नाही तेव्हा गोड काय बनवायचं? हा प्रश्न पडतो. त्यावेळी तुम्हाला जर उपवसाला गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकत साबुदाणा खीर. कमीत कमी वेळात टेस्टी अशी साबुदाणा खीर कशी बनवायची? ही रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य
भिजवलेला साबुदाणा 1 वाटी, ड्राय फ्रूटस, 2 चमचे तूप, चवीनुसार साखर आणि 1 पाव दूध.
Mahashivratri 2025: महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त चुकवू नका!
साबुदाणा खीर बनवण्याची कृती
साबुदाणा 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर साबुदाणा खीर बनवण्यासाठी सर्वात आधी भांड्यात तूप टाकून घ्यायचे आहे. तूप थोडे गरम झाले की, त्यात काप करून घेतलेले ड्रायफ्रूटस टाकून घ्यायचे आहे. ते 2 मिनिट परतवून घ्यायचे. त्यानंतर बाजूला काढून ठेवायचे. त्यानंतर त्याच भांड्यात साबुदाणा टाकून तो थोडा परतवून घ्यायचा. परतवून झाला की त्यात दूध टाकायचे. साबुदाणा तुपात जास्त कडक होऊ द्यायचा नाही. जेवढा साबुदाणा घेतला तेवढं जास्त दूध लागेल. 1 वाटी साबुदाणा असेल तर 1 पाव दूध तुम्ही घेऊ शकता.
साबुदाणा दुधात फुलायला लागल्यावर त्यात साखर टाकून घ्या. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते मिश्रण 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर खीर तयार झाली असेल. त्यानंतर त्यात ड्रायफ्रुटस टाकायचे. कमीत कमी वेळात टेस्टी अशी साबुदाण्याची खीर तयार होते. ही खीर खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की बनवून ट्राय करू शकता.