TRENDING:

यंदाच्या 31 डिसेंबरला घरीच बनवा हॉटेल स्टाईल सुरमई रवा फ्राय, पाहा रेसिपी Video

Last Updated:

हॉटेलच्या शेफने घरीच हॉटेल स्टाईल रवा फ्राय ही डिश कशी बनवता येईल, याबाबत सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर, 25 डिसेंबर: नॉनव्हेज खायचे असेल तर अनेकांची आवडती ठिकाणं असतात. त्यात मासे खाण्यासाठी तर कोल्हापूरकरांना कोकणी किंवा स्पेशल सी फूड हॉटेल्स कडे आपला मोर्चा वळवावा लागतो. मात्र कोल्हापूरच्या राही डाईन इन् या हॉटेलच्या शेफने घरीच हॉटेल स्टाईल रवा फ्राय ही डिश कशी बनवता येईल, याबाबत सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरला आपण घरच्या घरीच चविष्ट माशांचा आस्वाद घेऊ शकतो.

advertisement

सुरमई रवा फ्राय या डिशमध्ये बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ मासा खायला मिळत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिश वेळेपूर्वी तयार करुन आपण फ्रीझरमध्ये साठवून ठेवू शकता. जेणेकरून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मासा तळून घेऊ शकतो, असे शेफ इजाज सय्यद यांनी सांगितले आहे.

31 डिसेंबरला नारळाच्या दुधाचा वापर करून घरीच बनवा केरळी स्टाईल ‘ही’ रेसिपी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा

advertisement

सुरमई रवा फ्रायसाठी लागणारे साहित्य

खरंतर रवा फ्राय बनवण्यासाठी आपण सुरमई किंवा पापलेट मासा वापरू शकतो. मासा बाजारातून आणल्यानंतर सुरुवातीला तो नीट साफ करून घ्यावा. त्यानंतर माशाचे मध्यम आकाराचे काप करुन ते आले, लसूण, हळद, मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करुन ठेवावेत. तर रवा फ्राय या पाककृतीसाठी आले-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, रवा, तांदळाचे पीठ आणि कोकम आगळ लागते. या व्यतरिक्त मासा तळण्यासाठी घरगुती तेल लागते, असे इजाज यांनी सांगितले आहे.

advertisement

कमी साहित्यामध्ये झटपट तयार करा पाकातली दहीपुरी; घरातील सर्व आवडीने खातील

काय आहे पाककृती ?

1) सुरुवातीला एका प्लेटमध्ये आले-लसूण पेस्ट घ्यावी. त्यामध्ये लाल तिखट टाकावे.

2) त्यावर 2-3 चमचे कोकम आगळ आणि चवीनुसार मीठ टाकून ठेवावे.

3) दुसरीकडे माशांच्या कापांना लावण्यासाठी रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून ठेवावे.

advertisement

4) 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ हे बनवलेल्या मसाल्यामध्ये मिसळून ते मिश्रण छान एकत्र करून घ्यावे.

5) त्यानंतर माशाचे काप प्रथम तयार केलेल्या मसाल्यामध्ये आणि नंतर रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून बाजूला ठेवावेत.

6) तर हे माशाचे काप तळताना आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय देखील करू शकतो.

7) शेवटी मासा थोडा तपकिरी रंगात तळून झाल्यानंतर मासा बाहेर काढावा आणि लिंबू आणि कांद्यासोबत खायला घ्यावा.

दरम्यान, माशाला कोटिंग करताना मध्यम आकाराचा भरडा कच्चा रवा घ्यावा, असेही शेफ इजाज यांनी सांगितले आहे. तर अशा प्रकारची सुरमई रवा फ्राय ही डिश बऱ्याच जणांना खायला आवडत असते. त्यामुळे शेफ इजाज यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरीच ही डिश बनवू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
यंदाच्या 31 डिसेंबरला घरीच बनवा हॉटेल स्टाईल सुरमई रवा फ्राय, पाहा रेसिपी Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल