31 डिसेंबरला नारळाच्या दुधाचा वापर करून घरीच बनवा केरळी स्टाईल ‘ही’ रेसिपी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
31 डिसेंबरसाठी कोल्हापूरच्या एका हॉटेलच्या शेफने केरळी स्टाईल मच्छी करी असलेल्या मीन मोईली या पदार्थाची पाककृती सांगितली आहे.
नॉनव्हेज मधील प्रत्येक पदार्थ योग्य पद्धतीने आपल्याला घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळेच आपल्याला हॉटेलमध्ये जावे लागते. मात्र कोल्हापूरच्या डाइन इन् या हॉटेलचे शेफ असलेल्या इजाज सय्यद यांनी केरळी स्टाईल मच्छी करी असलेल्या मीन मोईली या पदार्थाची पाककृती सांगितली आहे.
advertisement
advertisement
मीन मोईली बनवण्यासाठी सुरमई किंवा पापलेट माशाचे काप हे सुरुवातीला आले, लसूण, हळद, मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करुन ठेवावेत. तर पाककृतीसाठी कडीपत्ता, मोहरी, हळद, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक मोठी वाटी नारळाचे दूध लागते. याव्यतरिक्त नारळाचे तेल हा पदार्थ बनवताना वापरावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement