राष्ट्रवादीचं ठरलं? अजितदादा-रोहित पवार आणि अमोल कोल्हेंची बैठक संपली, निर्णय काय झाला?
- Reported by:Govind Wakde
- Published by:Sachin S
Last Updated:
आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिजाई या निवास्थानी जाऊन भेट घेतली.
पुणे : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची हालचाल सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र लढणार असं जवळपास निश्चित झालं आहे.
आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिजाई या निवास्थानी जाऊन भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आला नाही. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र लढण्याचं ठरलं आहे. एकत्र निवडणूक लढवायची असेल तर जागा वाटपाचे अंतिम निर्णय घ्यावे लागणार अशी बैठकीत तिघांची चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
तसंच, या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना फोन केला. एकत्र लढलो तर कसा फायदा होईल, पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा याबद्दल चर्चा झाली. आता येत्या २ दिवसात पिंपरी चिंचवडमधील जागांचा अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. 'बैठकीत फक्त पिंपरी चिंचवड मधील जागांचा बाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. कुठल्या ही निष्कर्षापर्यंत पोहचू नका, आज आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे. फक्त "वेट अँड वॉच" करा, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 11:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
राष्ट्रवादीचं ठरलं? अजितदादा-रोहित पवार आणि अमोल कोल्हेंची बैठक संपली, निर्णय काय झाला?










