TRENDING:

Sabudana Thalipeeth : नवरात्री उपवासात खिचडीचा कंटाळा आलाय? बनवा चविष्ट साबुदाणा थालीपीठ, रेसिपीचा Video

Last Updated:

दररोज साबुदाणा खिचडी खायलाचा अनेकाना कंटाळा येतो. यावर पर्याय म्हणून तुम्ही खिचडीऐवजी चविष्ट साबुदाणा थालीपीठ बनवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. या दिवसांत अनेकजण उपवास करतात. पण दररोज साबुदाणा खिचडी खायलाच अनेकांना कंटाळा येतो. यावर पर्याय म्हणून तुम्ही खिचडीऐवजी चविष्ट साबुदाणा थालीपीठ बनवू शकता. आज आपण साबुदाणा थालीपीठ कसं बनवायचं याविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement

साबुदाणा थालीपीठ बनवण्याचं साहित्य

साबुदाणा थालीपीठ तुम्ही अगदी कमी वेळात आणि घरगुती साहित्यात बनवू शकता. एक वाटी भिजवलेला साबुदाणा, दोन उकडलेले बटाटे, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, जिरे, थोडीशी कोथिंबीर, तेल आणि चवीनुसार मीठ. एवढ्याशा साहित्यात तुम्ही उपवासासाठी चविष्ट आणि लुसलुशीत साबुदाणा थालीपीठ बनवू शकता.

Weight Gain Tips : वजन वाढवण्यासाठी बेस्ट आहे दुध चपातीचे कॉम्बिनेशन! वाचा जबरदस्त फायदे..

advertisement

साबुदाणा थालीपीठ बनवण्याची कृती

सुरुवातीला अर्धी वाटी साबुदाणा धुऊन 20 मिनिटांसाठी भिजवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका आणि तो 5-6 तास झाकून ठेवा. दरम्यान दोन बटाटे उकडून घ्या आणि सालं काढा. बटाटे किसून घ्या. त्यात भाजलेले शेंगदाणे अर्धवट बारीक करून मिसळा. हिरव्या मिरच्या आणि भिजवलेला साबुदाणा मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून बटाट्यात घाला. त्यात जिरे, मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं नीट मिसळा. पाण्याचा वापर टाळा.

advertisement

आता गोळा तयार झाला की थालीपीठ थापायला सुरुवात करा. ओल्या कापडावर गोळ्याचे थालीपीठ थापा. खूप जाड किंवा खूप पातळ न ठेवता मध्यम जाडीचे ठेवा. गरम तव्यावर तेल पसरवून थालीपीठ सावकाश टाका. झाकण ठेवून दोन मिनिटे भाजा. नंतर बाजूने तेल सोडून पलटी करा आणि दुसऱ्या बाजूनेही सोनेरी होईपर्यंत भाजा. फायनली लुसलुशीत साबुदाणा थालीपीठ तयार आहे. हे दही, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणीसोबत खूपच स्वादिष्ट लागते. उपवासाच्या दिवसात हा खिचडीला एक उत्तम पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Sabudana Thalipeeth : नवरात्री उपवासात खिचडीचा कंटाळा आलाय? बनवा चविष्ट साबुदाणा थालीपीठ, रेसिपीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल