किवी आणि बनाना स्मूदी करण्यासाठी लागणारे साहित्य
एक मोठ्या आकाराचे केळ, मोठ्या आकाराची किवी, मध, पाणी, पिस्ता आणि खस सरबत हे साहित्य लागेल. (तुमच्याकडे जर खस सरबत नसेल तर तुम्ही यामध्ये इसेन्सचा देखील वापर करू शकता.)
advertisement
किवी आणि बनाना स्मूदी करण्याची कृती
सर्वप्रथम एक किवीचे काप करून घ्यायचे. हे केलेले काप थोड्यावेळ फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये चांगला थंडपणा आणि फ्रेशनेस येतो. सर्वप्रथम केळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे. ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्यानंतर किवी देखील मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. यांचा चांगलं बारीक मिश्रण करून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं. चांगली घट्ट पेस्ट याची करून घ्यायची.
हे तयार झालेले मिश्रण एका ग्लास मध्ये काढायचं. आता सर्व्ह करण्यासाठी मिश्रण ग्लासमध्ये टाकलेले आहे. यामध्ये एक चमचा खस सरबत टाकायचं. एक चमचा मध टाकायचा आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. गार्निशिंगसाठी वरतून पिस्ताचे बारीक तुकडे करून टाकायचे. अशा पद्धतीने हेल्थ स्मूदी बनवून तयार होतो.