भरपूर कांदा, लसूण आणि खोबरं ही इथल्या जेवणाची त्रिसूत्री आहेत . खोबऱ्याच्या वापरात. खोबऱ्याचा वापर कसा केला जातो, यावरून ते कुटुंब उत्तर कोकणातलं आहे की दक्षिण कोकणातलं हे दर्दी खवय्ये ओळखू शकतात. उत्तर कोकणात नारळाचा चव, दूध किंवा ओलं खोबरं कच्चं वाटून वापरण्याची पद्धत प्रामुख्यानं आढळते, तर दक्षिण कोकणात कांदा-खोबऱ्याचं खमंग वाटण असतं.
advertisement
बेस्ट स्ट्रीट फूडचा घ्यायचाय आस्वाद? मुंबईतील 'या' 7 ठिकाणी द्या भेट
वेगवेगळ्या भाज्यांकरिता खोबऱ्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीची झणझणीत आणि टेस्टी वाटण कस बनवलं जाते हे दाखवणार आहोत, पुण्यातल्या मधुरा जाधव यांनी याबाबत खास माहिती दिली आहे.
कोकणी वाटणासाठी साहित्य
एक वाटी खोबरं,दोन कांदे (मध्यम),2 चमचे तेल पाच ते सहा लसूण पाकळ्याधने, दालचिनी आणि खडा मसाला
कोकणी वाटण बनवण्याची कृती
पहिल्यांदा कढईत खोबरं 10 मिनिटं भाजून घ्यावे . त्यानंतर कांदा उभा कापून तेलात भाजून घ्यावा, खडा मसाला देखील हलकासा भाजून घ्यावा. लसूण आणि अद्रक हे देखील मिक्सर मधून बारीक काढून घ्यावेत. हे वाटण तयार करत असताना यामध्ये पाणी टाकू नये . या मसाल्यात पाणी न घातल्यास हाच मसाला 10 ते 15 दिवस फ्रिज मध्ये ठेऊन वापरता येऊ शकतो.
सण उत्सवाला गोडधोड करायचंय? कमी साहित्यात करा ‘ही’ रेसिपी
हा तयार मसाला कडधान्य,मटन,चिकन,अंडाकरी तसेच इतरही नॉनव्हेज पदार्थ अथवा कोणत्याही ग्रेव्हीसाठी वापरू शकता. या पध्दतीने झटपट रस्साभाजी बनवण्यासाठी तुम्हीही कोकणी गोडं वाटणाचा आस्वाद घेऊ शकता.
मासे ,चिकण ,मटण या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या ही कोकणातली खासियत. कटाची आमटी, वालाची आमटी, कडधान्याची आमटी असे कित्येक प्रकार आहेत यामध्ये देखील तुम्ही हे वाटण घालू शकता,' अशी माहिती मधुरा यांनी दिली.