TRENDING:

Summer Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा इम्युनिटी बूस्टर, ड्रायफ्रूट्स मिल्कशेकची सोपी रेसिपी, Video

Last Updated:

Summer Recipe: उन्हाळ्यात कोल्डड्रिंक आणि इतर थंड पेये पिण्यापेक्षा घरच्या घरी इम्युनिटी बूस्टर बनवू शकता. ड्रायफ्रूट्स मिल्कशेक रेसिपी पाहुयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी 
advertisement

सांगली: उन्हाची तीव्रता वाढत असताना सर्वांनाच जिवाला थंडावा देणारे पदार्थ हवेसे वाटतात. अशा वेळी 'ड्रायफ्रूट्स मिल्कशेक' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अत्यंत आरोग्यदायी आणि इम्युनिटी बुस्टर ड्रायफ्रूट्स मिल्कशेक अगदी घरच्या घरी देखील बनवता येतो. याची सोपी रेसिपी लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

मिल्कशेकसाठी लागणारे साहित्य

पाव वाटी बदाम, दहा-बारा काजू, एक चमचा मगजबीया, दोन चमचे साखर, दोन ग्लास दूध आदी साहित्य घरच्या घरी ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवण्यासाठी लागेल.

advertisement

Summer Recipe: उन्हाळ्यात बनवा 15 दिवस टिकणारी रेसिपी, मुलं मागून खातील गुळपापडी!

ड्रायफ्रूट मिल्कशेक कृती

सर्वप्रथम एका कढईमध्ये मंद आचेवर बदाम, काजू, मगजबीया चरचरीत भाजून घ्या. तुमच्या आवडीनुसार यामध्ये अक्रोड, खजूर तसेच अंजीर देखील घालू शकता. दोन-तीन मिनिटांमध्ये बदाम काजूंना सोनेरी चट्टे पडल्यानंतर बिया एका प्लेटमध्ये काढून घ्या. बिया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर फिरवून घ्या.

advertisement

एका भांड्यामध्ये दोन ग्लास दूध घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर तयार केलेली दोन चमचे ड्रायफ्रूट पावडर, दोन चमचे साखर दुधामध्ये घाला. मंद आचेवर मिश्रण एकसारखे हलवून घ्या. अवघ्या दोन मिनिटातच मिश्रण काहीसे घट्ट होईल. त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार केशर किंवा हळद घालून ढवळून घ्या. तयार मिल्कशेक भांड्यामध्ये काढून काही वेळ फ्रीजमध्ये थंड होवू द्या. थंडगार मिल्कशेक पिण्यासाठी ग्लासमध्ये घेतल्यानंतर त्यावर चिमूटभर काजू बदामाचे काप घाला. प्रिमिक्स तयार करून ठेवल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात इम्युनिटी बूस्टर ड्रायफ्रूट्स मिल्कशेक तयार होईल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Summer Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा इम्युनिटी बूस्टर, ड्रायफ्रूट्स मिल्कशेकची सोपी रेसिपी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल