अंडा घोटाळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
अंडी, तेल, टेबल बटर, जिरे, कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, काळी मिरी पूड, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ आदी साहित्य लागेल.
अंडा घोटाळा बनवण्याची कृती
सुरुवातीला अंडी उकडून त्यांची साल काढून बारीक किसून घ्यावीत. कढई गरम करून त्यात 2 टेबलस्पून तेल व 2 टेबलस्पून बटर घालावे. बटर वितळल्यानंतर जिरे घालून तडतडू द्यावेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व आलं-लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. पुढे बारीक चिरलेला टोमॅटो घालून २–३ मिनिटे परतून घ्यावा. हळद, गरम मसाला व काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे व मसाला जळू नये म्हणून थोडेसे पाणी घालावे. आता किसलेली उकडलेली अंडी, मीठ व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून मंद आचेवर शिजू द्यावे.
advertisement
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून 1 अंडे थेट फोडून त्यावर मीठ, लाल मिरची पावडर व कोथिंबीर पसरवत एका बाजूने हाफ फ्राय करून घ्यावे. हे तयार अंडा हाफ फ्राय त्या मसाल्यात घालून मिक्स करावे. मिश्रण घट्ट वाटल्यास आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी व 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. अशा पद्धतीने सुरत स्पेशल स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा तयार होतो. तयार अंडा घोटाळा प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर पसरवून त्यावर पुन्हा एक अंडा हाफ फ्राय ठेवून गरमागरम पावसोबत खाऊ शकता.





