हॉटेल रूममधील हिडन कॅमेरा शोधण्याच्या सोप्या पद्धती
संशयास्पद वस्तूंवर लक्ष ठेवा
रूममध्ये प्रवेश केल्यावर पहिले काम म्हणजे संशयास्पद वस्तू तपासा. हिडन कॅमेरे अनेकदा स्मोक डिटेक्टर, घड्याळे, लॅम्प्स, यूएसबी चार्जर, किंवा आरशांमध्ये लपवलेले असतात. कोणत्याही असामान्य किंवा विचित्र दिसणाऱ्या वस्तूकडे बारकाईने बघा.
लाईट बंद करून तपासा
रूममधील सर्व लाईट बंद करा. नाईट व्हिजन असलेले काही कॅमेरे काम करत असताना एक लहानसा लाल किंवा हिरवा लाईट ब्लिंक करतात. डोळ्यांनी शांतपणे रूममध्ये असे कोणतेही ब्लिंक होणारे लाईट दिसत आहेत का, ते तपासा.
advertisement
मोबाईल फोनचा कॅमेरा वापरा
तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि रूममधील संशयास्पद ठिकाणे स्कॅन करा. जर कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर कोणताही छोटासा पांढरा किंवा जांभळा बिंदू दिसला, तर तिथे इन्फ्रारेड लाईट असलेला कॅमेरा असू शकतो.
फ्लॅशलाईटचा वापर करा
सर्व लाईट बंद करून मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करा. ती हळूहळू रूममधील संशयास्पद वस्तूंवर फिरवा. कॅमेऱ्याची लेन्स काचेची असल्यामुळे त्यावर प्रकाश पडताच तो चमकतो. जर तुम्हाला असा एखादा छोटासा बिंदू दिसला, तर तिथे कॅमेरा असू शकतो.
आरशाची तपासणी करा
हॉटेलमधील आरसा 'टू-वे मिरर' आहे की नाही, हे तपासा. आरशावर बोट ठेवा. जर बोट आणि प्रतिबिंबात अंतर नसेल आणि दोन्ही एकमेकांना स्पर्श करत असतील, तर तो टू-वे मिरर असण्याची शक्यता आहे.
वायफाय नेटवर्क तपासा
अनेक हिडन कॅमेरे वायफायवर चालतात. तुमच्या फोनच्या वायफाय स्कॅनर ॲपवरून रूममधील कोणते अज्ञात डिव्हाईस कनेक्ट आहे का, ते तपासा. हे सोपे उपाय वापरून तुम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करू शकता. काहीही संशयास्पद आढळल्यास, हॉटेल व्यवस्थापनाला त्वरित कळवा.