Jalna Rain: जालन्यात पावसाचं रौद्ररूप, कुंडलिका आणि सीनेच्या पुरात गाड्या गेल्या वाहून, VIDEO
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Rain: जालना शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे.
जालना: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने राज्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. जालना जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश आहे. जालना शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. सोमवारी (15 सप्टेंबर) रात्री 10 वाजेपासून ते मंगळवारी पहाटे 3 वाजेपर्यंत पावसाचा जोर अधिक असल्याने शहरातील कुंडलिका आणि सीना नदी दुथडी भरून वाहत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जालना शहरातून छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे आणि इतर शहरात जाणारी बस सेवा देखील विस्कळीत झाली आहे. शहरातील दोन्ही कुंडलिका आणि सीना नद्यांना पूर आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अन्नधान्याचं नुकसान झालं असून घरगुती सामान वाहून गेलं आहे.
advertisement
शहरातील लक्कलकोट भागामध्ये लाकडी वस्तू बनवण्याचं काम केलं जातं. नदीला पूर आल्याने लाकडासह लाकूड कापण्याच्या मशीन देखील वाहून गेल्या आहेत. पुलावर उभ्या असलेल्या दोन ते तीन चारचाकी गाड्या वाहून गेल्याचं बस स्टँड परिसरातील नागरिकांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर नदीकाठच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर तातडीची मदत करावी. मदत व बचाव कार्य सुरू करावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 16, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Rain: जालन्यात पावसाचं रौद्ररूप, कुंडलिका आणि सीनेच्या पुरात गाड्या गेल्या वाहून, VIDEO