चिया सीड्समध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत तयार होण्यास मदत होते. यात भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि वारंवार भूक लागत नाही. चिया सीड्स पोषणाचे पॉवरहाउस मानले जाते. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेल्या चिया सीड्सचे सकाळी रिकाम्यापोटी सेवन केल्याने शरीराला कोणते सहा फायदे मिळतात ते पाहा.
advertisement
Keyboard वर A,B,C,D क्रमात का लिहिली जात नाही? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
चिया सीड्सचं पाणी पिण्याचे फायदे :
1. पचनक्रिया सुधारते : चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण खूपच जास्त असते, ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तुम्ही रिकाम्यापोटी चिया सीड्सचे पाणी पिऊ शकता.
2. लठ्ठपणा : सकाळी रिकाम्यापोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात.
3. ब्लड शुगर : चिया सीड्समधील फायबर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. डायबेटिसच्या रुग्णांसाठी चिया सीड्सचे पाणीच खूप फायद्याचे ठरते.
4. हृदय : चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड व अँटिऑक्सिडंट्स असतात जे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
5. त्वचा : चिया सीड्सचं पाणी पिणं त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे, कारण चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात.
6. एनर्जी : चिया सीड्समध्ये प्रोटीन व ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं जे एनर्जी वाढवण्याचं काम करते. त्यामुळे चिया सीड्सचे सेवन करणं फायद्याचं ठरतं.