मात्र योग्य पद्धत आणि काही सोप्या स्टेप्स लक्षात ठेवल्या तर कमी वेळातही तुम्ही अगदी परफेक्ट साडी ड्रेप करू शकता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणि इंस्टाग्रामवरील रेखा मिश्रा (mishra_rekha_) यांनी सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
अशा प्रकारे नेसा परफेक्ट साडी..
- साडी नेसण्याची सुरुवात करण्याआधी पेटीकोट नीट फिटिंगचा घातलेला असावा. सर्वात आधी साडीचा एक पूर्ण राउंड घ्या आणि कंबरभोवती साडी नीट खोचून (टक इन करून) घ्या. यामुळे साडीचा बेस मजबूत राहतो आणि पुढचं ड्रेपिंग सोपं होतं.
advertisement
- यानंतर पदराच्या निऱ्या करण्याकडे लक्ष द्या. यासाठी पदराचा छोटासा भाग आधी नीट फोल्ड करून घ्या. मग त्या फोल्ड केलेल्या भागाच्या निऱ्या तयार करा. निऱ्या सेट झाल्यावर फोल्ड केलेला भाग मोकळा करा. या पद्धतीमुळे निऱ्या एकाच वेळी, सरळ आणि परफेक्ट पडतात.
- आता समोरच्या निऱ्या बनवायच्या आहेत. पदराच्या बाजूने आधी एक निरी तयार करा आणि ती कंबरेजवळ खोचून घ्या. यामुळे पुढील निऱ्या नीट रेषेत येतात आणि साडीचा समोरचा भाग आकर्षक दिसतो.
- यानंतर साडीचा पायाजवळचा खालचा भाग घ्या आणि त्याच्या निऱ्या घाला. या निऱ्या तयार झाल्यावर त्या पायाखाली धरून ठेवा. नंतर खालच्या बाजूने पडलेल्या निऱ्या वरच्या बाजूला नीट सेट करून सेफ्टी पिनच्या मदतीने पेटीकोटला फिक्स करा.
- आता निऱ्यांच्या बाजूचं उरलेलं कापड हलकेच ओढून निऱ्यांच्या खाली आणा आणि पोटाच्या मध्यभागाजवळ नीट खोचून घ्या. यामुळे साडीला नीट शेप मिळतो आणि ड्रेपिंग अधिक एलिगंट दिसतं.
- शेवटी सेंटरची निरी नीट सेट करा, पदर हव्या त्या लांबीचा ठेवा आणि गरज असल्यास सेफ्टी पिन वापरा.
इतकं केल्यावर तुमचं साडी ड्रेपिंग पूर्ण झालं आहे. थोडा सराव आणि या सोप्या टिप्स वापरल्या तर घाईतसुद्धा तुम्ही साडी अगदी आत्मविश्वासाने आणि परफेक्ट पद्धतीने नेसू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
