जाणून घेऊयात हे NiMe डाएट नेमकं आहे तरी काय ?
advertisement
NiMe डाएट म्हणजे काय?
असं म्हटलं जातं जशजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसा अन्नाचा दर्जा हा खालावत गेला. अन्नावर विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्यामुळे त्यातली पोषकतत्वे नष्ट होऊ लागली. हाच धागा पकडून पूर्वीच्या काळी म्हणजेच जगात जोपर्यंत औद्योगिक क्रांती झाली नव्हती, त्या आधी लोकं ज्या पद्धतीचा आहार घेत होते तशाच प्रकारच्या आहारात थोडेफार बदल करून हा या निम डाएट तयार करण्यात आलाय. या नव्या डाएटमुळे फक्त वजनच कमी होत नाही तर आतड्यांना प्रचंड फायदा होतो. नव्या डाएटमुळे आतडे आतून तर स्वच्छ होतातच पण त्याचं आतलं आवरण किंवा अस्तरही मजबूत होतं. यामुळे जुन्या आणि दुर्धर आजारांचा धोकाही टाळता येतो. या नव्या डाएटमध्ये वनस्पती आधारित सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जसं की हिरव्या भाज्या, सर्व प्रकारच्या कडधान्यं, संपूर्ण धान्य आणि काही प्रमाणात प्राण्यांची प्रथिनं. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, मिठाई, मांस आणि गव्हापासून बनवलेल्या वस्तू या आहारातून वगळण्यात आल्या आहेत. या डाएटमध्ये फायबरचं प्रमाण 22 ग्रॅम प्रति 1000 कॅलरीज निश्चित करण्यात आलं आहे.
पोटापासून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे निम डाएट
आयर्लंड येथील प्रोफेसर पॉल रॉस सांगतात की, ‘अनेक आजारांची सुरूवात ही पोटातून होते. त्यामुळे पोटाला शांत केलं किंवा त्याला आराम दिला तर अनेक आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे आम्ही असं अन्न तयार केलंय ज्यामुळे पोटाला आराम मिळू शकेल. औद्योगिकीकरणामुळे आपल्या खाण्याच्या सवयींवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे आपल्या पोटातील मायक्रोबायोम् खराब झालेत. आपल्या पोटात चांगल्या गोष्टींचं वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आपण खाण्यापिण्याच्या जुन्या सवयी, पद्धतींकडे वळावं लागेल. हे संशोधन युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा यांसह अनेक विद्यापीठांतील संशोधकांनी केले असून त्याच्या मानवी चाचण्या करण्यात आल्या असून आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत. या डाएटमुळे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉल 17 टक्क्यांनी कमी झालं. याशिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण 6 टक्क्यांनी तर सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाण 14 टक्क्यांनी कमी झाले. हृदरोग आणि कर्करोगासाठी शरीरात सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचं जास्त प्रमाण हे कारणीभूत असतं.