नेहमीच्या आहाराइतकीच महत्त्वाची आहेत ताजी फळं खाणं. डॉक्टर किंवा घरातले ज्येष्ठही ऋतूनुसार आहार तसंच फलाहार करण्याचा सल्ला देतात. कारण फळं खाल्ल्यानं त्वचा सुधारते. फळं म्हणजे निसर्गानं त्वचेची देखभाल करण्यासाठी दिलेला सहज उपलब्ध असलेला उपाय आहे.
फळांमधल्या अँटीऑक्सिडंट्स, पाणी, एंजाइम आणि जीवनसत्त्वांमुळे त्वचेला आतून पोषण मिळतं. ज्यामुळे त्वचा मऊ राहते. त्यामुळे त्वचा हिवाळ्यात निस्तेज होत असेल तर ही फळं खायला सुरुवात करा.
advertisement
Sankrant Special : संक्रांतीला हेच पदार्थ का ? जाणून घ्या ऋतूनुसार आहाराचं महत्त्व
संत्री - त्वचेचा कोरडेपणा कमी व्हावा, त्वचेची चमक कायम राहावी यासाठी, संत्र हे उत्कृष्ट फळ आहे. संत्र्यांमधल्या व्हिटॅमिन सीच्या प्रमाणामुळे कोलेजन उत्पादन वाढतं. त्वचेतला ऑक्सिडेटिव्ह ताण यामुळे कमी होतो आणि त्वचेवरचे काळे डाग यामुळे कमी होतात. सकाळची सुरुवात एक ग्लास संत्र्याचा रस पिऊन करा. त्वचा उजळ करण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेला फेस वॉश आणि व्हिटॅमिन सी असलेल्या सीरमचाही वापर करु शकता.
पेरू - त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी पेरु उपयुक्त ठरतो. त्यात संत्र्यांपेक्षा चार पट जास्त व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे ते हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठीचं एक सुपरफ्रूट आहे. पेरू थोडं मीठ घालून खाऊ शकतो. तसंच पेरूचा रस हा देखील एक चांगला पर्याय आहे. पेरूमुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार राहायला मदत होते.
Face Wash : जुनं ते सोनं, महाग फेसवॉश विसरा, चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा फेसवॉश
डाळिंब - त्वचेला हायड्रेट करण्यासाठी, डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी डाळिंब उत्कृष्ट आहे. डाळिंबामधला शक्तिशाली अँटीऑक्सिडंट प्युनिकलागिनमुळे त्वचेचा घट्टपणा आणि लवचिकता राखण्यास मदत होते. यामुळे, कोलेजन उत्पादनालाही मदत होते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि गुळगुळीत दिसते. डाळींब खाणं तसंच डाळिंबाचा रस पिणं उपयुक्त ठरतं.
