Face Wash : खास हिवाळ्यासाठी आयुर्वेदिक फेसवॉश, महाग फेसवॉश घेण्याआधी या नैसर्गिक घटकांनी करा चेहरा स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेल्या फेस वॉशनं चेहऱ्याचा रंग केवळ बाहेरुन नाही आतूनही सुधारेल. त्वचेशी संबंधित समस्याही यामुळे कमी होतात. दही, ओटमील आणि मध, मध, दूध आणि बेसन, हळद, बेसन आणि दूध,मुलतानी माती, गुलाबजल आणि मध या उपायांनी चेहऱ्यावरच्या मृत त्वचेच्या पेशी कमी होतात आणि रंग उजळतो.
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोणतंही महाग उत्पादन घेणार असाल तर थांबा. आधी ही माहिती वाचा. आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेल्या फेस वॉशबद्दलची माहिती जाणून घ्या.
आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेल्या फेस वॉशनं चेहऱ्याचा रंग केवळ बाहेरुन नाही आतूनही सुधारेल. त्वचेशी संबंधित समस्याही यामुळे कमी होतात. दही, ओटमील आणि मध, मध, दूध आणि बेसन, हळद, बेसन आणि दूध,मुलतानी माती, गुलाबजल आणि मध या उपायांनी चेहऱ्यावरच्या मृत त्वचेच्या पेशी कमी होतात आणि रंग उजळतो.
advertisement
दही, ओटमील आणि मध - या उपायानं चेहरा आतूनही स्वच्छ होतो. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ सुकल्यानंतर ते हलक्या हातानं स्वच्छ पुसून काढा. हलक्या हातानं मसाज केल्यानं रक्ताभिसरण देखील सुधारतं, ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.
मध, दूध आणि बेसन - हिवाळ्यात, चेहरा कोरडा आणि निर्जीव होतो आणि मॉइश्चरायझर लावल्यानंही फारसा परिणाम होत नाही. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि चेहरा खोलवर स्वच्छ करण्यासाठी, मध, दूध आणि बेसन यांचं मिश्रण लावा. वाळल्यानंतर, हलक्या हातानं पुसून काढा. यामुळे चेहऱ्यावरची छिद्रं खोलवर स्वच्छ होतील आणि मधामुळे त्यांना एकसमान ओलावा मिळेल.
advertisement
मुलतानी माती, गुलाबजल आणि मध - त्वचा तेलकट असेल तर चेहरा वारंवार धुवावा लागतो. यासाठी, चेहरा स्वच्छ करण्यासाठी मुलतानी माती, गुलाबजल आणि मधाचं मिश्रण वापरावं. मुलतानी माती त्वचेतील तेल शोषून घेते आणि गुलाबजल आणि मध चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चरायझ ठेवते.
advertisement
हळद, बेसन आणि दूध - चेहऱ्यावर डाग आणि टॅनिंग असेल तर हळद, बेसन आणि दुधाचं मिश्रण तयार करा आणि दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा. पातळ पेस्ट बनवा आणि कापसाच्या बोळ्यानं चेहऱ्यावर लावा. आवडत असेल तर काही काळासाठी तसंच ठेवू शकता. दुधामुळे डाग हलके व्हायला मदत होते आणि हळदीमुळे मुरुम कमी होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 6:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Face Wash : खास हिवाळ्यासाठी आयुर्वेदिक फेसवॉश, महाग फेसवॉश घेण्याआधी या नैसर्गिक घटकांनी करा चेहरा स्वच्छ