Skin Care : चेहऱ्यासाठी सूर्यफूलाच्या बिया वापराव्यात का ? वापर कसा करायचा ? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेसाठी कोणतंही महाग उत्पादन वापरण्याआधी सूर्यफुलाच्या बिया वापरुन पाहा. हिवाळ्यातल्या खास स्किन केअर ट्रिटमेंटसाठी या छोट्या बियांची मोठी मदत होऊ शकते. या बिया लहान दिसत असल्या तरी यात त्वचेसाठी आवश्यक अनेक पौष्टिक घटक आहेत.
मुंबई : जानेवारी मध्यावर आलाय, हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागेल. आता काही ठिकाणी थंडी वाढलेली असली तरी काही ठिकाणी संमिश्र हवा आहे.
हिवाळ्यात आणि बदलत्या हवेत त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडं सीरम वापरत असाल तर ही माहिती नक्की वाचा. त्वचेसाठी कोणतंही महाग उत्पादन वापरण्याआधी सूर्यफुलाच्या बिया वापरुन पाहा. हिवाळ्यातल्या खास स्किन केअर ट्रिटमेंटसाठी या छोट्या बियांची मोठी मदत होऊ शकते. या बिया लहान दिसत असल्या तरी यात त्वचेसाठी आवश्यक अनेक पौष्टिक घटक आहेत.
advertisement
हिवाळ्यात सूर्यफूलाच्या बिया का फायदेशीर आहेत ते पाहूया -
हिवाळ्यात, थंड वारे, उष्णता, प्रदूषण आणि आद्रतेचा अभाव यामुळे त्वचेवर थकवा जाणवू शकतो. सूर्यफुलाच्या बिया यासाठी खूप उपयुक्त आहेत. कारण यामधे व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
advertisement
व्हिटॅमिन ई - त्वचेला नैसर्गिक चमक देणारं जीवनसत्व आहे.
हेल्दी फॅट्स - कोरडी आणि भेगा पडलेली त्वचा आतून बरी करण्यासाठी उपयुक्त.
झिंक - मुरुमं आणि डाग कमी करण्यासाठी प्रभावी.
अँटीऑक्सिडंट्स - प्रदूषण आणि तणावामुळे होणारी त्वचा सतेज होण्यास मदत करते.
advertisement
सूर्यफुलाच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूया
एक-दोन टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया
थोडंसं कोमट दूध
एक टीस्पून मध
कोमट दुधात बिया तीन-चार तास किंवा रात्रभर भिजत ठेवा, नंतर त्यांची जाड पेस्ट बनवा. मध घालून चेहरा आणि मानेला लावा. पंधरा-वीस मिनिटांनी कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. यामुळे मृत त्वचा निघून जाते, ओलावा वाढतो आणि त्वचा मऊ होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यासाठी सूर्यफूलाच्या बिया वापराव्यात का ? वापर कसा करायचा ? वाचा तज्ज्ञ काय सांगतात







