Face Pack : डाळिंब फेसपॅकविषयी ऐकलंत का ? पाहूया डाळिंबाचा रस वापरुन तयार करता येतील असे फेसपॅक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डाळिंबाच्या रसात कधी मध, कधी ओट्स, कधी हळद, कधी दही, तर कधी काकडी, कधी लिंबू वापरुनही फेसपॅक तयार करता येतो. यातले अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतात. पाहूयात डाळिंबाचा फेसपॅक कसा तयार करतात.
मुंबई : चेहरा स्वच्छ सुंदर दिसावा यासाठी क्लीन अप, फेशियल सर्रास केले जातं. तसंच, काही फेसपॅकही घरी तयार करता येतात. फ्रुट फेशियलही करतात, तसाच एका फळाचा वापर करुन तयार करता येतो फेसपॅक. डाळिंबाचा फेसपॅक.
महागड्या सौंदर्यप्रसाधनांमधे असलेल्या रसायनांमुळे अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. यासाठी, डाळिंबाचा फेसपॅक करुन पाहता येईल. डाळिंबाच्या रसात कधी मध, कधी ओट्स, कधी हळद, कधी दही, तर कधी काकडी, कधी लिंबू वापरुनही फेसपॅक तयार करता येतो. यातले अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतात. पाहूयात डाळिंबाचा फेसपॅक कसा तयार करतात.
advertisement
फेशियल करण्यासाठी चेहरा स्वच्छ करणं हा पहिला टप्पा. डाळिंबाच्या रसानं चेहरा स्वच्छ करा. यासाठी, डाळिंबाच्या रसात ड्राय मिल्क पावडर मिसळा आणि क्लीन्सर तयार करा. या क्लींजरनं चेहऱ्यावर मसाज करा आणि दोन-तीन मिनिटांनी धुवा. यामुळे चेहऱ्यावरची धूळ निघून जाईल आणि त्वचा मऊ राहील.
डाळिंबाच्या रसानं स्क्रब करा - फेशियलचा दुसरा टप्पा म्हणजे स्क्रब. यासाठी डाळिंबाचा रस, तांदळाचं पीठ आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टनं चेहरा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचेच्या पेशी, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सहज निघून जातील. त्वचा जास्त संवेदनशील असेल तर तांदळाच्या पिठाऐवजी ओट्सची पावडर देखील घालू शकता.
advertisement
फेस पॅक - फेशियलच्या तिसऱ्या टप्प्यात, फेस पॅक वापरायचा. यासाठी, डाळिंबाच्या रसात बेसन आणि ड्राय मिल्क पावडर मिसळा. हे मिश्रण ब्रशनं चेहऱ्यावर लावा, आणि त्यावर टिश्यू लावा. यानंतर, फेसपॅकचा पातळ थर टिश्यूच्या वर लावा. तीस मिनिटांनी फेसपॅक काढा आणि चेहरा धुवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 7:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Face Pack : डाळिंब फेसपॅकविषयी ऐकलंत का ? पाहूया डाळिंबाचा रस वापरुन तयार करता येतील असे फेसपॅक










