YouTube फीड खुप बोरिंग झालीये? करा हे काम, दिसतील तुमच्या आवडीचे व्हिडिओ
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
यूट्यूबवर अब्जो व्हिडिओ उपलब्ध आहे. मात्र अनेकदा प्लॅटफॉर्म असे व्हिडिओज पाहायला लावतो. जो तुम्हाला आवडत नाहीत. अशा परिस्थितीत तुमची फीड सहज पद्धतीने रिसेट केली जाऊ शकते.
YouTube ओपन करताच आपल्याला हजारो व्हिडिओज दिसतात. पण अनेकदा कोणता व्हिडिओ पाहावा यामध्ये कंफ्यूजन होतं. यूट्यूब तुम्हाला तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ रिकमंड करत असते. मात्र अनेकदा रिकमंडेशन हे खुपच बोरिंग होते. वारंवार यूट्यूब ओपन केल्यावर अशा प्रकारचे आपल्याला आवडत नसणारे व्हिडिओ वरच दिसू लागतात. तुमच्या यूट्यूब फीडवरही असंच काही झालं असेल तर एका ट्रिकने तुम्ही तुमच्या आवडीचे व्हिडिओ पुन्हा मिळवू शकता.तुमचा YouTube फीड कसा सुधारायचा पाहूया.
advertisement
advertisement
तुमचे लाईक्स रीसेट करा - तुम्हाला आवडलेल्या किंवा नापसंत केलेल्या व्हिडिओंच्या आधारावर YouTube तुमच्या फीडमध्ये समान कंटेट पाठवते. तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला असेल, तर तुमच्या फीडमध्ये त्या प्रकारचे अधिक व्हिडिओ दिसतील. हे रीसेट करण्यासाठी, YouTube अॅप उघडा आणि तुम्ही टॅब उघडा. त्यानंतर तुम्ही लिस्ट केलेल्या व्हिडिओंमधून तुमचे लाईक्स काढून टाकू शकता.
advertisement
advertisement










