Marathi Serial : मालिकेत कोर्ट रूम ड्रामा, केस लढवण्यासाठी नायिकेला खऱ्या वकिलांकडून ट्रेनिंग

Last Updated:
नव्याने सुरू झालेल्या मालिकेत कोर्ट रूम ड्रामा पाहायला मिळणार आहे. या स्पेशल सीनसाठी मालिकेच्या नायिकेला खऱ्या वकिलांकडून ट्रेनिंग मिळालं आहे.
1/7
हल्ली मालिकांमध्ये कोर्टरूममधील हायवोल्टेज ड्रामा दाखवला जातो. प्रेक्षकही तो आवडीनं पाहतात. ठरलं तर मग मालिकेतून कोर्टरूम सीन प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. त्यासाठी कलाकारांनाही तितकीच मेहनत घेतली होती. 

advertisement
2/7
स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली 'वचन दिले तू मला' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे.

3/7
या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे कोर्ट आणि केस जरी खोटी असली तरी त्यासाठी मालिकेच्या नायिकेला थेट खऱ्या वकिलांकडून ट्रेनिंग दिलं गेलं आहे. 

4/7
पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली.

5/7
या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली,
या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, "उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन."
advertisement
6/7
मालिकेत सध्या निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाचा ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे.

7/7
'वचन दिले तू मला' ही मालिका रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होते. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता इंद्रनील कामत प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच अभिनेते मिलिंद गवळी देखील मालिकेत व्हिलनच्या भूमिकेत आहेत.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement