Income Tax Recruitment 2026: आयकर विभागात खेळाडूंना नोकरीची संधी! 80 हजारहून अधिक पगार, अर्ज कसा करायचा?

Last Updated:

मुंबई आयकर विभागामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आयकर विभागामध्ये नोकरीची संधी आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे.

News18
News18
मुंबई: मुंबई आयकर विभागामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आयकर विभागामध्ये नोकरीची संधी आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. एकूण 97 जागांसाठी ही नोकर भरती होणार असून त्या तीनही वेगवेगळ्या पदांसाठी नोकरभरती होणार आहे. मुंबई आयकर विभागामध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत? पात्रता काय? सर्व माहिती जाणून घेऊया...
मुंबई आयकर विभागामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ, खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू यांना नोकरीची संधी मिळणार आहे. तीनही पदे क्रिडा संबंधित असून वेगवेगळ्या खेळातले स्पर्धक या नोकर भरतीसाठी सहभागी होऊ शकणार आहेत. खेळाच्या पात्रतेसोबतच अर्जदार 12वी उत्तीर्णही असावा.
advertisement
स्टेनोग्राफर ग्रेड- 2 पदासाठी 12 जागा, टॅक्स असिस्टंट पदासाठी 47 जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 38 जागांसाठी नोकर भरती होणार आहे. 07 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख आणि पेमेंट करण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड- 2 आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी 25,500 ते 81,100 पर्यंत पगार, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18,000 ते 56,900 पर्यंत पगार असणार आहे.
advertisement
मुंबई आयकर विभागात नवीन नियुक्त होणाऱ्या नोकरदारांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड- 2 पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट, टॅक्स असिस्टंट पदासाठी 18 ते 27 वर्षे वयाची अट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18 ते 25 वर्षे वयाची अट असणार आहे. अनुसूचित जाती- जमाती वर्गातील उमेदवारांना वयासाठी 10 वर्षांची सूट असणार आहे. फी 200 रूपये इतके असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी एकदा जाहिरात पाहूनच अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
जाहिरातीच्या PDF ची ऑनलाईन लिंक- https://drive.google.com/file/d/1Vd12R4zHtbgaPxXObqVkJmVQ9BrYmvm5/view
ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक-
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Income Tax Recruitment 2026: आयकर विभागात खेळाडूंना नोकरीची संधी! 80 हजारहून अधिक पगार, अर्ज कसा करायचा?
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement