Makar Sankranti 2026 : पारंपरिक सणाला गोड जोड, पुण्यात मिळतंय चक्क तिळगुळ चॉकलेट, हे आहे लोकेशन
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मकर संक्रांती म्हणजे गोडवा, आनंद आणि आपुलकीचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ वाटण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे.
पुणे : मकर संक्रांती म्हणजे गोडवा, आनंद आणि आपुलकीचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ वाटण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. मात्र, काळानुरूप बदल स्वीकारत पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्ती बेकरीने या पारंपरिक सणाला आधुनिकतेची गोड जोड दिली आहे. गेली अनेक वर्ष विविध सणांनिमित्त चॉकलेटचे खास पदार्थ बनवणारी ही बेकरी मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट तयार करत असून ते पुणेकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
सध्या बाजारात तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गूळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, मूर्ती बेकरीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक चवीला आधुनिक चॉकलेटचा स्पर्श देत तयार करण्यात येणारे पदार्थ. मकर संक्रांतीनिमित्त येथे तिळगुळ चॉकलेट, तिळाचे चॉकलेट, आंबा वडी, तीळ वडी, श्रीखंड वडी, गूळ पोळी आणि पुरणपोळी असे विविध प्रकारचे गोड पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ गेली अनेक वर्ष सातत्याने बनवले जात असून ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे.
advertisement
विशेष म्हणजे तिळगुळ चॉकलेट हे उत्पादन पुणे शहरात इतरत्र कुठेही सहज उपलब्ध नसल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हे चॉकलेट विशेष भावते. पारंपरिक तिळगुळाची चव कायम ठेवत त्यात चॉकलेटचा अनोखा संगम साधण्यात आला असल्याने ग्राहक पुन्हा पुन्हा याची खरेदी करत आहेत.
advertisement
याबाबत माहिती देताना विक्रम मूर्ती म्हणाले, विविध सणांनिमित्त आम्ही चॉकलेटचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पारंपरिक पदार्थांची चव जपत त्यात नावीन्य आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच हे पदार्थ 70 रुपयांपासून उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मूर्ती बेकरीत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधणारे हे गोड पदार्थ पुणेकरांच्या संक्रांतीचा आनंद अधिकच वाढवत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 7:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Makar Sankranti 2026 : पारंपरिक सणाला गोड जोड, पुण्यात मिळतंय चक्क तिळगुळ चॉकलेट, हे आहे लोकेशन







