Mahapalika Elections : मतदानाला सुट्टी, मतमोजणीच्या दिवशी शाळा सुरू का बंद? समोर आली मोठी अपडेट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरूवार 15 जानेवारीला मतदान पार पडत आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरूवार 15 जानेवारीला मतदान पार पडत आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी 14 जानेवारीला राज्यातल्या काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर मुंबईतल्या महापालिकांच्या शाळा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
दरम्यान 16 जानेवारीला मतमोजणीच्या दिवशीही शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. मुख्याध्यापक संघटनेच्या या मागणीवर प्रशासनाने अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. 14 आणि 15 जानेवारीला शिक्षक निवडणुकीचं काम करणार आहेत. तसंच 15 जानेवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली तरी त्यानंतरही मतदानाचं इतर काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना बराच वेळ मतदान केंद्रामध्ये थांबावं लागणार आहे. या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गुरूवारी रात्री घरी पोहोचायला उशीर झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा शाळेमध्ये पोहोचण्यात अडचणी आहेत, त्यामुळे शुक्रवारीही शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.
advertisement
बुधवारी ऑनलाईन शाळा
निवडणूक आयोग मतदानासाठी मुंबई महापालिकेच्या शाळा ताब्यात घेणार आहे, त्यामुळे बुधवारी मुंबई महापालिकेच्या शाळा ऑनलाईन घेतल्या जातील. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, म्हणून बुधवारी शाळा ऑनलाईन पद्धतीने होतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे. 15 जानेवारीला शाळांना सुट्टी असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mahapalika Elections : मतदानाला सुट्टी, मतमोजणीच्या दिवशी शाळा सुरू का बंद? समोर आली मोठी अपडेट!










