संक्रातींच्या दिवशी काळाचा घाला, पिंपरीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आईने फोडला हंबरडा

Last Updated:

पेट्रोल पंपाजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.

News18
News18
पुणे : ऐन संक्रातीच्या दिवशी काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणींची नावे ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०, दोघी रा. पुनावळे, पुणे) अशी आहेत. ऋतुजा आणि नेहा या दोघी दुचाकीवरून आपल्या कामानिमित्त निघाल्या होत्या. धनगर बाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपाजवळ त्या पोहोचल्या असताना, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने भरधाव वेगात जोरदार धडक दिली.

दुचाकीचा अक्षरशः चुराडा

advertisement
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने दोघींनाही मृत घोषित केले.

ट्रक चालकाला घेतले ताब्यात

अपघातानंतर ट्रक चालक जितेंद्र निराले याला काळेवाडी पोलिसांनी तात्काळ ट्रकसह ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ट्रकचा वेग अधिक असल्याचे समोर येत असून, काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास करण्यात येत आहे.
advertisement

शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दरम्यान, भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निष्पाप दोन तरुण बहिणींचा जीव गेल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आहे. वाहतूक नियमांचे पालन आणि जड वाहनांवर कडक नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
संक्रातींच्या दिवशी काळाचा घाला, पिंपरीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आईने फोडला हंबरडा
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement