लग्न असो किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, कामामुळे अनेकदा ताण आणि उत्साह जाणवतो, याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. शिवाय, हिवाळ्यात त्वचेची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेणं आवश्यक असतं.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निरुपमा परवंडा यांनी लग्न आणि पार्ट्या किंवा यासारख्या धावपळीच्या कार्यक्रमांसाठी तीन दिवसांचा स्किन डिटॉक्स प्लान शेअर केला आहे. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि ग्लो कायम राहतो. तीन दिवस नियमितपणे हे केल्यानं त्वचेला खूप फायदा होईल आणि त्वचेवर चांगली चमक देखील येईल.
advertisement
Weight Gain : तिशीनंतर चरबी वाढण्याची कारणं काय ? शरीरात नेमकं काय होतं ?
हायड्रेशन, निरोगी आहार आणि स्किन रिसेट - पहिल्या दिवशी, हायड्रेशन आणि निरोगी आहार घेण्यावर लक्ष केंद्रित करा. हायड्रेशनमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा निरोगी दिसते.
हंगामी फळं आणि भाज्या खा आणि प्रथिनांसाठी मसूर, पनीर, टोफू, अंडी किंवा चिकन खा. तसंच भोपळ्याच्या बिया, बदाम किंवा अक्रोड खाण्यावर भर द्या, यामधे झिंक आणि निरोगी चरबी म्हणजेच हेल्दी फॅटस् भरपूर असतात.
Skin Care : स्किनकेअर क्षेत्रातले बदलते ट्रेंड, वाचा 2025 मधे होती कशाची चर्चा
स्किन बॅरियर - दुसऱ्या दिवशी, सौम्य क्लीन्सर वापरा आणि त्वचेच्या प्रकारासाठी योग्य हायड्रेटिंग सीरम लावा. स्किन बॅरियरसाठी हायड्रेशन आणि चांगलं स्किनकेअर रुटिन आवश्यक आहे.
ग्लो आणि रेस्ट - तिसऱ्या दिवशी, त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा आणि सौम्य सीरम आणि मॉइश्चरायझर लावा. डॉ. परवंडा यांच्या मते, त्वचेला विश्रांती द्या आणि नवीन उत्पादनं वापरणं टाळा. याशिवाय, त्वचा चांगली राहावी यासाठी, किमान सात-आठ तास झोप घ्या आणि मॉइश्चरायझर वापरा.
