TRENDING:

Vitamins : जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचा रंग बदलतो का ? जीवनसत्त्वांच्या योग्य संतुलनासाठी काय करायचं ?

Last Updated:

चेहऱ्याचा रंग बदलण्यामागे बाह्य कारणं नाही तर शरीरातली कारणं जबाबदार असतात. व्हिटॅमिनची कमतरता हे त्यामागचं प्रमुख कारण असतं. त्वचा निस्तेज किंवा काळी पडत असेल, तर ते व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. या कमतरतेमुळे त्वचेचं रंगद्रव्य वाढू शकतं आणि ती निस्तेज दिसू शकते. व्हिटॅमिन डी आणि ई च्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होऊ शकते आणि काळेपणा वाढू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर होतो. अनेकदा फोटो नीट यावा यासाठी, मेकअप, क्रीम आणि फिल्टर वापरले जातात. पण या झाल्या चेहऱ्यावरच्या खुणा लपवण्यासाठीच्या युक्त्या.
News18
News18
advertisement

अनेकदा, चेहऱ्याचा रंग बदलण्यामागे बाह्य कारणं नाही तर शरीरातली कारणं जबाबदार असतात. व्हिटॅमिनची कमतरता हे त्यामागचं प्रमुख कारण असतं. त्वचा निस्तेज किंवा काळी पडत असेल, तर ते व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. या कमतरतेमुळे त्वचेचं रंगद्रव्य वाढू शकतं आणि ती निस्तेज दिसू शकते. व्हिटॅमिन डी आणि ई च्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होऊ शकते आणि काळेपणा वाढू शकतो.

advertisement

Health Tips : हिवाळ्यासाठी हा काढा ठरेल रामबाण, कान, नाक होईल मोकळं

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो -  कोणत्याही जीवनसत्वामुळे त्वचा थेट काळे होत नाही, पण जीवनसत्त्वं C आणि B12 ची कमतरता असते तेव्हा मेलेनिन संतुलन बिघडतं, ज्यामुळे त्वचेचा रंग असमान होतो. विशेषतः जे जास्त वेळ उन्हात राहतात किंवा सनस्क्रीन लावत नाहीत त्यांच्यामध्ये हा परिणाम अधिक दिसून येतो.

advertisement

त्वचा काळी पडण्याची कारणं - सूर्याची तीव्र अतिनील किरणं, झोपेचा अभाव, ताणतणाव, हार्मोनल बदल आणि चुकीचा आहार ही त्वचा काळी पडण्याची प्रमुख कारणं आहेत. कॉस्मेटिक उत्पादनांचा जास्त वापर देखील त्वचेला हानी पोहोचवू शकतो.

Teeth Care : दातांचा पिवळेपणा होईल कमी, दातांच्या स्वच्छतेसाठी चांगला पर्याय

कोणत्या पदार्थांमुळे मेलेनिन वाढतं ?

advertisement

नैसर्गिकरित्या त्वचा चांगली राहण्यासाठी, आहारात अंडी, दूध, मासे, गाजर, पपई, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. या पदार्थांमधील जीवनसत्त्वे अ, क, ई आणि बी12 मेलेनिन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

चेहरा काळा पडला तर काय करायचं ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतला पपई बागेचा बळी, शेतकऱ्याचे 15 लाखांचे नुकसान, खर्चही निघाला नाही
सर्व पहा

सनस्क्रीन लावा. दररोज भरपूर पाणी प्या. शक्य असेल तर, लिंबू आणि कोरफडीच्या जेलचा वापर करून घरगुती उपाय करून पहा. तसंच, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि पुरेशी झोप घ्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamins : जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचा रंग बदलतो का ? जीवनसत्त्वांच्या योग्य संतुलनासाठी काय करायचं ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल