चालणं हा एक उत्तम असा व्यायाम आहे. सामान्यपणे लोक चालतात का तर वजन, कॅलरीज कमी करण्यासाठी. चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होतं. आरामशीर चालण्यापेक्षा जलद चालणे अधिक फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चढ असलेल्या ठिकाणी चाललात, तर सपाट रस्त्यावर चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतील. चालण्यामुळे तुमच्या पायांचे स्नायू मजबूत होतात आणि ते अधिक सुडौल दिसू शकतात. पण चालण्याचे यापेक्षाही आणखी काही फायदे आहेत.
advertisement
काय! पुरुषांनाही येतो मेनोपॉज, पण कसा, लक्षणं काय? चेन्नईच्या डॉक्टरांनी सांगितलं
ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्या नेहमीच्या कॅफिनऐवजी घरी असो वा ऑफिसमध्ये थोड्या वेळ चालण्याचा पर्याय निवडा. तुम्ही थकलेले किंवा झोपलेले असताना चालणे ऊर्जा वाढवण्यासाठी अधिक प्रभावी ठरते. कारण ते शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह आणि कॉर्टिसोल, एपिनेफ्रीन आणि नॉरेपिनेफ्रीन यांसारख्या ऊर्जा हार्मोन्सची पातळी वाढवते.
नियमित चालण्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, कमी वेळ आणि अधूनमधून चालल्यानेही रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते. व्यायामासाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही जेवणानंतरही चालू शकता.
चालण्याने हार्ट अटॅक कसा रोखता येतो?
चंद्रपूरचे डॉक्टर श्याम मेडा यांनी सांगितलं, जे जिमला जाऊ शकत नाही, त्यांनी दररोज चालावं. दररोज 8000 ते 10000 पावलं चालून तुम्ही तुमच्या हृदयाला मजबूत ठेवू शकता. एका अभ्यासात सिद्ध झालं आहे की दररोज 30-40 मिनिटं चालून तुम्ही तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारु शकता, स्ट्रेस कमी करू शकता आणि ब्लड प्रेशर, लठ्ठपणाला नियंत्रित करू शकता. तुम्ही दररोज 10000 स्टेप्स चाललात तर हार्ट अटॅकचा धोका 20 ते 30 टक्के कमी होतो, असंही अभ्यासात सिद्ध झालं आहे.
10000 पावलं कशी मोजायची?
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या लोकांकडे त्यांची पावलं मोजण्याचं उपकरण नाही, ते दररोज 10 हजार पावलं कशी मोजू शकतात?
बिस्किट खाल्ल्याने मुलांवर 4 डेंजर परिणाम; सांगलीच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरात काय काय होतं?
नोएडा येथील फोर्टियर फिटनेस अकादमीचे प्रशिक्षक देव सिंह यांनी 'न्यूज18'ला सांगितलं की, साधारणतः 1 किलोमीटर चालण्यात 1300 ते 1500 पावलं मोजली जातात. त्यानुसार 10 हजार पावलांमध्ये सुमारे 7.5 ते 8 किलोमीटर अंतर कापलं जाऊ शकतं. अनेक लोक हे अंतर 7 किलोमीटरमध्येही पूर्ण करू शकतात. हे लोकांच्या चालण्याच्या पद्धती, उंची आणि गतीवरही अवलंबून असतं. तुमच्याकडे पावलं मोजण्याचे उपकरण नसेल, तर 7-8 किलोमीटर चालून तुम्ही हे लक्ष्य पूर्ण करू शकता.
