केस हे आपल्या व्यक्तीमत्वाला तेज देण्याचे काम करतात. आकर्षक आणि योग्यरित्या स्टाईल केलेल्या केसांमध्ये व्यक्तमत्व खुलून येते आणि चारचौघात तुम्ही आकर्षक दिसू लागता. परंतु केमिकल ट्रिटमेंट्स, स्टायलिंग मशीन्सचा अतिवापर आणि प्रदूषण, ऊन व धूळ यांसारख्या बाह्य घटकांमुळे आपले केस दिवसेंदिवस कमजोर होत आहेत.
एकदा केसांचे नुकसान झाले तर ते दुरुस्त करणे खूप कठीण असते, पण अश्यक नाही. केसांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या केसांना पुन्हा एकदा चमकदार बनवू शकता. यासाठी येथे तुम्ही लगेच घरच्याघरी करू शकणाऱ्या काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत, जे तुमच्या केसांना पुन्हा नवी चमक आणू शकतात.
advertisement
केसांसाठी घरगुती उपाय..
केसांना दह्याने मॉइश्चरायझ करा : केसांना पुन्हा मॉइश्चर देणे खूप अवघड असते, पण यासाठी दही हा एक उत्तम उपाय आहे. केसांना कोरडेपणामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी साधे दही वापरा. दह्यातील लॅक्टिक ऍसिड केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. जास्त कुरळे केस असलेल्यांसाठी दही खूप फायदेशीर आहे. कारण ते केसांच्या रोमछिद्रांना (follicle) गुळगुळीत करते. यासाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. फक्त साधे दही केसांना लावा आणि 20 मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा. त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.
कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी नारळाचं तेल : तुमच्या केसांची स्थिती खूपच खराब आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर नारळाचे तेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. नारळाचं तेल कोरड्या आणि निस्तेज केसांना चमक देण्यासाठी एक जुना आणि प्रभावी उपाय आहे. शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावल्याने केस जास्त पाणी शोषून घेणार नाहीत. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस फुगणे थांबते.
प्रोटिनसाठी अंड्याचा वापर : अंडी प्रोटिनचा उत्तम स्रोत आसतात हे तर तुम्हाला माहिती असेलच. अंड्यांमध्ये असलेले अमिनो ऍसिड केसांसाठी खूप फायदेशीर असतात. ते केसांना मॉइश्चर करते, पोषण देते आणि प्रदूषण व सूर्याच्या हानीपासून वाचवते. यासाठी तुम्ही अंड्यातील पांढरा भाग आणि पिवळा बलक दोन्ही वापरू शकता. दोन्ही भाग व्यवस्थित मिक्स करा आणि ते केसांना लावा. 20 ते 30 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हा मास्क जास्त वेळा वापरू नका, कारण जास्त प्रोटिनमुळे केसांना नुकसानही होऊ शकते.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.