गोंद कतीरा हे सरबतांमध्ये टाकून पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. बरेच लोक ते लस्सीमध्ये टाकूनदेखील पितात. पण हा गोंद कतीरा सोशल मीडियावर दाखवला जातो तितका फायदेशीर खरंच आहे का? याचं उत्तर प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांनी आपल्या एका व्हिडिओद्वारे दिलं आहे. त्यांनी उन्हाळ्यासाठी एक अतिशय उत्तम ड्रिंकदेखील सुचवलं आहे.
गोंद कतीराबद्दल काय आहे तज्ज्ञांचं मत..
advertisement
न्यूट्रिशनिस्ट रायन यांच्यामते, गोंद कतीरा आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यात फायदेशीर आहे. कारण यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आहेत. हे मिनरल्स तुमची हाडं मजबूत बनतात. मसल्स आणि नर्व्ह्सला आधार देतात. तसंच गोंद कतीरा खूप रिफ्रेशिंग आणि हायड्रेस्टिंग आहे. हे जणू काही नैसर्गिक एसीच आहे. हा अतिशय थंड, आराम देणारा आणि रिफ्रेश करणारा पदार्थ आहे.
रायन यांनी एका पेयाचं त्यांच्या व्हिडिओमध्ये कौतुक केलं आहे. यामध्ये भिजवलेला गोंद कतीरा, सब्जा सीड्स, आईस अप्पल आणि नारळपाणी आहे. त्यांनी या ड्रिंकचा सुपर हायड्रेटिंग आणि शरीरासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं म्हणलं आहे.
गोंद कतीराचे फायदे..
- गोंद कतीरामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास आणि एकूण हायड्रेशनची पातळी राखण्यास मदत होते.
- गोंद कतीरामधील हाय फायबर बद्धकोष्ठतेत आराम देऊ शकते.
- गोंद कतीराचे थंड गुणधर्म त्वचेला शांत आणि ताजेतवाने करण्यास मदत करतात.
- गोंद कतीराचे दाह-विरोधी गुणधर्म सांधेदुखी आणि सूजेपासून आराम देऊ शकतात.
- गोंद कतीरा स्टॅमिना आणि ऊर्जेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते, ज्यामुळे थकवा जाणवणाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
