TRENDING:

Dehydration : डोकं दुखणं, चिडचीडही असू शकतात डिहायड्रेशनचे संकेत, वेळेवर आणि पुरेसं पाणी प्या, शरीराची हानी रोखा

Last Updated:

आपल्या शरीरातली कोणतीही प्रक्रिया पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून, पाणी न पिणं हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. पाणी खूप कमी पीत असाल, तर शरीर पाच प्रकारे संकेत देत असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वेळेवर पाणी न पिण्याचे शरीरावर खूप गंभीर परिणाम होतात. अनेकदा पाणी पिणं लक्षात राहत नाही. पण यामुळे आपण बऱ्याचदा तासन्तास पाणीच पित नाही.
News18
News18
advertisement

पाणी न पिण्यामुळे बाहेरून आपल्याला फक्त घसा कोरडा किंवा स्नायूंचा थोडासा कडकपणा जाणवू शकतो, पण शरीराच्या आत वेगळ्याच प्रकारचा गोंधळ सुरू असतो. आपण डिहायड्रेट होतो तेव्हा आपल्या पेशी आकुंचन पावू लागतात. आपल्या मूत्रपिंडांना आपल्या शरीरातील उर्वरित पाणी टिकवून ठेवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळे दिसतो.

Jamun : आरोग्यासाठी उपयुक्त जांभूळ, उन्हाळ्यात स्वादिष्ट जांभळं खाण्याचे फायदे

advertisement

अलिकडच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की अमेरिकेतील चोवीस टक्के वृद्धांना डिहायड्रेशनचा त्रास आहे. आपल्या शरीरातली कोणतीही प्रक्रिया पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून, पाणी न पिणं हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. पाणी खूप कमी पीत असाल, तर शरीर पाच प्रकारे संकेत देत असतं.

थोड्याशा श्रमानंही श्वास घेण्यास त्रास होणं - डिहायड्रेशनमुळे शरीरातील एकूण रक्ताचं प्रमाण कमी होतं. याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो, ज्यामुळे रक्तपुरवठा करण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त काम करावं लागतं. परिणामी, विश्रांतीच्या वेळीही हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि खूप थकवा जाणवू शकतो. या परिस्थितीत, जिममधे व्यायाम करणं हे डोंगर चढण्यासारखं काम वाटू शकतं, कारण स्नायू लवकर थकतात.

advertisement

डोकेदुखी आणि चक्कर येणं - खूप कमी पाणी प्यायल्यानं मेंदूच्या ऊती तात्पुरत्या आकुंचन पावतात, विशेषतः मेंदूचा तो भाग जो वेदना जाणवतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील बिघडू शकतं. या दोन्ही बदलांमुळे थेट डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.

त्वचेची चमक कमी होणं - भरपूर पाणी प्यायल्यानं वृद्धत्वाची प्रक्रिया थांबत नसली तरी, पाण्याच्या अभावामुळे तुम्ही नक्कीच वृद्ध दिसू शकता. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी, निस्तेज होते आणि सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे, डॉक्टर अनेकदा रुग्णांच्या त्वचेवर खेचून त्याचं निदान करतात.

advertisement

Weight Loss : क्या करु या ना करु? वजन कमी कसं करायचं ? जिमला जाऊन वजन कमी होतं?

पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी पाणी आवश्यक आहे. कमी पाणी पिता तेव्हा आतडी मलामधून जास्त पाणी शोषून घेतात. यामुळे मल कडक होतो आणि बद्धकोष्ठता होते. शिवाय, 2024 च्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, आतड्यांना हानिकारक जंतूंपासून वाचवण्यासाठी आणि चांगले बॅक्टेरिया राखण्यासाठी पुरेसं पाणी पिणं अत्यंत महत्वाचं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

मेंदूला सर्वात आधी डिहायड्रेशनचा त्रास होतो हे अनेकांना माहित नसतं. शरीरातील एक ते दोन टक्के पाणी कमी झाल्यानंही लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. यातून काम पूर्ण करू शकलात तरीही चिडचिड होते आणि कामाचा ताण जाणवतो. शिवाय, डिहायड्रेशनमुळे मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला वेदना होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर आणि पुरेसं पाणी पिणं लक्षात ठेवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dehydration : डोकं दुखणं, चिडचीडही असू शकतात डिहायड्रेशनचे संकेत, वेळेवर आणि पुरेसं पाणी प्या, शरीराची हानी रोखा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल