TRENDING:

Dizziness : झोपेतून उठतानाच चक्कर येते ? वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, जाणून घ्या कारणं आणि उपचार

Last Updated:

दिवसाची सुरुवात उत्साहात नाही पण चक्कर येण्यानं होत असेल तर असं का होतं समजून घेऊया. अंथरुणातून उठल्याबरोबर किंवा अचानक उभं राहिल्याबरोबर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी हलतायत असं वाटतं. काहींना डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, तोल जाणं अशी सर्व लक्षणं जाणवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : झोप पूर्ण झाल्यावर सकाळी दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते खरं पण काहींच्या बाबतीत तसं होत नाही. काहीजणांना झोपेतून उठतानाच चक्कर येते.
News18
News18
advertisement

दिवसाची सुरुवात उत्साहात नाही पण चक्कर येण्यानं होत असेल तर असं का होतं समजून घेऊया. अंथरुणातून उठल्याबरोबर किंवा अचानक उभं राहिल्याबरोबर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी हलतायत असं वाटतं. काहींना डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, तोल जाणं अशी सर्व लक्षणं जाणवतात.

सकाळच्या अस्वस्थेचं सर्वात सामान्य कारण म्हणजे व्हिटॅमिन बी12 ची कमतरता. कोबालामिन म्हणूनही ओळखलं जाणारं, हे पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन आहे. आपल्या शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी  हे व्हिटॅमिन आवश्यक असतं.

advertisement

Coughing : ऊन, पाऊस, थंडीचा होतो प्रकृतीवर परिणाम, साध्या सोप्या उपायांची होईल मदत, सर्दी - खोकला होईल गायब

तथापि, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर ते स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्या आहारातून मिळवावं लागतं.

व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सकाळी चक्कर का येते?

व्हिटॅमिन बी12 लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. या पेशी तुमच्या फुफ्फुसातून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, विशेषतः तुमच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन वाहून नेतात. बी12 ची कमतरता असते, तेव्हा तुमचं शरीर पुरेशा निरोगी लाल रक्तपेशी तयार करू शकत नाही, ज्यामुळे ॲनिमिया जाणवतो आणि चक्कर येते.

advertisement

Hair Care : केसांच्या मजबुतीसाठी पौष्टिक पदार्थ, केसांचं मुळापासून होईल पोषण, केस होतील घनदाट

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कानाच्या आतील संतुलनात समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे चक्कर येते. काही जण रात्रभर पाणी न पिता झोपतात, ज्यामुळे सकाळी रक्तदाब कमी होऊन चक्कर येऊ शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसाच्या पट्ट्यात 'पैशाचं पीक', 15 गुंठे शेती अन् 5 महिन्यात लखपती, सांगलीच्या शेतकऱ्यानं कशी केली कमाल? Video
सर्व पहा

शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. आपला आहार आरोग्यदायी ठेवा, ज्यामधे जीवनसत्त्वयुक्त धान्यं, दूध, दही, चीजचा समावेश असावा. मांसाहारी असाल, तर आहारात मासे, अंडी, मांस आणि चिकन यांचा समावेश करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dizziness : झोपेतून उठतानाच चक्कर येते ? वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, जाणून घ्या कारणं आणि उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल