उच्च रक्तदाबाला अनेकदा सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण अनेकांना आपल्याला होत असलेला त्रास उच्च रक्तदाबामुळे होतोय हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो. सुरुवातीला, ही लक्षणं खूपच सौम्य असतात आणि अनेकदा सामान्य थकवा, ताण किंवा वयाशी संबंधित समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं. हा विलंब आणि दुर्लक्ष आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरु शकतो. कारण काही काळानं, उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
advertisement
Walking : उत्तम आरोग्यासाठी चाला, प्रत्येक मिनिट देईल ऊर्जा, वाचा आणखी फायदे
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
वारंवार डोकेदुखी
वारंवार डोकेदुखी होत असेल, विशेषतः डोक्याच्या मागच्या भागात, तर ते फक्त ताण किंवा झोपेचा अभाव आहे असं समजू नका. हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकतं.
अंधूक किंवा धूसर दिसणं
रक्तदाब वाढल्यानं डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो, ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते किंवा डोळ्यांमध्ये ताण येऊ शकतो.
छातीत जडपणा जाणवणं किंवा हृदयाचा ठोका जलद पडणं
कधीकधी छातीत सौम्य वेदना, जडपणा किंवा कोणत्याही कारणाशिवाय हृदयाचे ठोके जलद होणं हे देखील उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. हा हृदयविकाराचा झटका आहे असे समजून घाबरू नका, परंतु निश्चितपणे तपासणी करा.
चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे
रक्तदाब वाढतो तेव्हा वारंवार चक्कर येणं किंवा कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात. प्रत्यक्षात, जेव्हा शरीरात रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही तेव्हा मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही. यामुळे, व्यक्तीला चक्कर येणं किंवा लवकर थकवा येणं यासारख्या समस्या जाणवतात.
Intestinal Health : कमजोर आतड्यांना द्या ताकद, आहारात या घटकांचा करा समावेश, पचनसंस्था राहिल मजबूत
श्वास घेण्यास त्रास होणे
थोडं काम किंवा छोटी कामं करूनही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हृदय आवश्यकतेपेक्षा जास्त काम करत असल्याचं लक्षण असू शकते.
सतत पाच लक्षणं जाणवत असतील, तर नियमितपणे रक्तदाब तपासणं आवश्यक आहे. या सर्वांव्यतिरिक्त, निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि ताण व्यवस्थापनानं हे नियंत्रित केलं जाऊ शकतं. उच्च रक्तदाब हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणं जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर स्वतःची तपासणी करा.
