तीव्र चक्कर येण्याआधी, शरीरात काही बदल होतात, जे ओळखणं महत्त्वाचं आहे. चक्कर येणं किंवा डोकं हलकं होणं, अशक्तपणा आणि थकवा जाणवणं, डोक्यात जडपणा किंवा दाब जाणवणं, उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखं वाटणं, धूसर दृष्टी किंवा काळोखी येणं, हृदयाचे ठोके जलद किंवा असामान्य होणं, ऐकण्याची क्षमता कमी होणं किंवा कानात आवाज येणं. ही लक्षणं दिसली तर शरीर तुम्हाला संभाव्य धोक्याची चिन्हं सांगत आहे हे नक्की.
advertisement
तीव्र चक्कर येण्याची मुख्य कारणं - रक्तदाबात चढ उतार, पाण्याची कमतरता, रक्तातील साखर कमी होणं (हायपोग्लायसेमिया), अनुवांशिक किंवा न्यूरोलॉजिकल समस्या, कानाची समस्या, तणाव किंवा चिंता, निद्रानाश किंवा झोपेचा अभाव, औषधांचे दुष्परिणाम. योग्य उपचार करण्यासाठी ही कारणं समजून घेणं महत्वाचं आहे.
चक्कर येते आहे कळल्यावर पडण्याचा धोका कमी करण्यासाठी बसा किंवा झोपा. हळूहळू श्वास घ्या आणि आराम करा. पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय प्या. चक्कर कमी होईपर्यंत हालचाल टाळा. मळमळ होत असेल तर हलकं अन्न खा आणि विश्रांती घ्या.
Meningitis : मेंदूची सूज आरोग्यासाठी धोकादायक, वेळीच लक्षणं ओळखा, सावध राहा
चक्कर येऊ नये म्हणून घरगुती आणि खबरदारीचे उपाय -
दररोज पुरेसं पाणी प्या.
फळं, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या.
नियमित व्यायाम करा आणि तणाव नियंत्रित करा.
दीर्घकाळ उभं राहणं टाळा.
पुरेशी झोप घ्या आणि शरीराला विश्रांती द्या.
