TRENDING:

Hair Care : अलोपेसिया एरिआटा म्हणजे काय ? यावर कोणते उपचार करायचे ? आहारात कोणते बदल करता येतील ?

Last Updated:

पण, टाळूवर गोलाकार ठिपक्यांच्या स्वरूपात अचानक केस गळणं हा अनुभव आला असेल तर याकडे केसगळती समजून दुर्लक्ष करु नका. ही स्थिती अनेकदा 'अलोपेसिया एरिआटा' नावाच्या आजाराशी संबंधित असते, ज्यामधे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली केसांच्या मुळांवर परिणाम करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस गळणं, केस कोरडं होणं या केसांशी संबंधित समस्या जाणवत असतात, त्यावर घरगुती उपाय आणि औषधोपचारही उपलब्ध आहेत.
News18
News18
advertisement

पण, टाळूवर गोलाकार ठिपक्यांच्या स्वरूपात अचानक केस गळणं हा अनुभव आला असेल तर याकडे केसगळती समजून दुर्लक्ष करु नका. ही स्थिती अनेकदा 'अलोपेसिया एरिआटा' नावाच्या आजाराशी संबंधित असते, ज्यामधे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली केसांच्या मुळांवर परिणाम करते.

वेळीच लक्ष दिलं तर काही सोपे घरगुती उपाय केले तर टाळूचं चांगलं पोषण होऊ शकतं. यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते आणि ही समस्या अधिक गंभीर होण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात.

advertisement

Health Tips : खूप तास एका जागी बसण्यानं होईल मोठं नुकसान, दीर्घकाळ बसण्याचे धोके ओळखा, सतर्क व्हा

हा एक स्वयंप्रतिरोधक म्हणजे ऑटोइम्यून आजार आहे. यात शरीर चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करतं, ज्यामुळे केसांचे छोटे छोटे पुंजके तयार होतात. याची लक्षणं प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.

advertisement

कांद्याचा रस - कांद्याचा रस केसांच्या देखभालीसाठी प्राचीन काळापासून वापरला जातो आहे. त्यात सल्फर असतं, यामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. नियमित वापरामुळे केसांची मुळं मजबूत होऊ शकतात.

कोरफड गर - कोरफडीमुळे टाळूला आराम मिळतो आणि ओलावा टिकवून ठेवला जातो. यामुळे खाज आणि दाह कमी होण्यास मदत होते. हा गर थेट टाळूवर लावून थोड्या वेळानं धुवून टाकणं फायदेशीर मानलं जातं.

advertisement

खोबरेल तेलानं मालिश - खोबरेल तेलामुळे केसांचं खोलवर पोषण होतं. हलक्या हातानं मालिश केल्यानं टाळूतील रक्ताभिरण सुधारतं, ज्यामुळे केसांच्या वाढीला मदत होते.

Health Tips : आंघोळीसाठी गरम पाणी घ्यायचं की गार ? आयुर्वेदात आहे उत्तर, वाचा सविस्तर माहिती

मेथीच्या दाण्यांची पेस्ट - मेथीचे दाणे भिजवून बनवलेली पेस्ट केसांसाठी फायदेशीर मानली जाते. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणं कमी होण्यास मदत होते.

advertisement

आवळ्याचा वापर - आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे केसांची ताकद आणि चमक टिकवून ठेवण्यास मदत होते. नियमित वापरामुळे केसांचं आरोग्य सुधारू शकतं.

टक्कल पडण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी, घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात, पण वेळेवर उपचार करणं तितकचं महत्त्वाचं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
सर्व पहा

या उपायासोबतच, केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या आणि तणाव व्यवस्थापनावर भर द्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : अलोपेसिया एरिआटा म्हणजे काय ? यावर कोणते उपचार करायचे ? आहारात कोणते बदल करता येतील ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल