TRENDING:

Breast Cancer : स्तनांचा कर्करोग होण्याची कारणं कोणती, भारतात कोणते घटक ठरतात जोखमीचे ?

Last Updated:

प्रजननाचा काळ, हार्मोनल एक्सपोजर आणि कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री या तीन घटकांमुळे भारतीय महिलांमधे स्तनांचा कर्करोग होण्याची जोखीम वाढते. बंगळुरूतल्या आयसीएमआरच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनं केलेल्या अभ्यासातली ही निरीक्षणं आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगभरात कर्करोगाचं प्रमाण खूप वाढतंय. भारतातही स्तनांचा कर्करोग वेगानं वाढतोय. आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अभ्यासानुसार, मांसाहार, कमी झोप आणि लठ्ठपणा हे स्तनाच्या कर्करोगाची जोखीम वाढवणारे घटक आहेत. ज्यामध्ये दरवर्षी सुमारे 5.6 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दरवर्षी अंदाजे पन्नास हजार नवीन रुग्णांची वाढ होते आहे.
News18
News18
advertisement

प्रजननाचा काळ, हार्मोनल एक्सपोजर आणि कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री या तीन घटकांमुळे भारतीय महिलांमधे स्तनांचा कर्करोग होण्याची जोखीम वाढते. बंगळुरूतल्या आयसीएमआरच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चनं केलेल्या अभ्यासातली ही निरीक्षणं आहेत.

Underarms : काखेतल्या काळेपणावर करा मात, या इलाजानं त्वचा होईल स्वच्छ, काळे डाग होतील कमी

advertisement

2022 मधे, जगभरातील महिलांमधे सुमारे 23 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली. स्तनांचा कर्करोग झालेल्या अंदाजे 6,70,000 रुग्णांचा मृत्यू झाला.

कर्करोगाच्या सुमारे 2,21,757 रुग्णांची नोंद झाली. लग्नाच्या वयानुसार स्तनाच्या कर्करोगाचा धोका हळूहळू वाढत गेला. शिवाय, दोनपेक्षा जास्त गर्भपात करणाऱ्या महिलांना गर्भपात न करणाऱ्या महिलांपेक्षा 1.68 पट धोका जास्त होता.

बहुतेक अभ्यासांत, स्तनपानाचा कालावधी आणि स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीत लक्षणीय संबंध आढळला नाही आणि ओरल गर्भनिरोधक वापराचा देखील कोणताही महत्त्वाचा संबंध दिसून आला नाही.

advertisement

Skin Detox : स्किन डिटॉक्स म्हणजे काय ? चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी काय बदल करायचे ?

या व्यतिरिक्त स्तनांच्या कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका:

स्तनात किंवा काखेत नवीन गाठ जाणवणं.

स्तनाच्या कोणत्याही भागात सूज किंवा जाडपणा जाणवणं.

स्तनाच्या त्वचेवर सूज किंवा खड्डे पडणं.

स्तनाग्र किंवा स्तनाभोवतीची त्वचा लालसरपणा किंवा सोलली जाणं.

advertisement

स्तनाग्र आतल्या बाजूनं मागे होणं किंवा स्तनाग्रभोवती वेदना जाणवणं.

स्तनाग्रांमधून रक्तासह दुधाव्यतिरिक्त इतर स्त्राव बाहेर येणं.

स्तनाच्या आकारात कोणताही बदल जाणवणं.

स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना होणं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

इथे सांगितलेली लक्षणं जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breast Cancer : स्तनांचा कर्करोग होण्याची कारणं कोणती, भारतात कोणते घटक ठरतात जोखमीचे ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल