जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 ची या वर्षाची संकल्पना आहे, "Bright products, dark intentions".
World Health Organisation म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या कंपन्या उत्पादन डिझाइन आणि मार्केटिंगद्वारे तरुण ग्राहकांना आकर्षित करतात. वेगवेगळे फ्लेवर्स, आकर्षक डिझाईन आणि सोशल मीडियावरचं जोरदार मार्केटिंग यामुळे तरुणाई त्याकडे आकर्षित होते. पण तंबाखूचा वापर असलेली अनेक उत्पादनं घातक आहेत.
advertisement
तंबाखू घातक आहे आणि त्यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे आजार होतात. हे भयंकर जीवघेणे आजार होऊ नयेत यासाठी अधिकाधिक लोकांना तंबाखू सोडण्यास प्रोत्साहित केलं जातं. धूम्रपान करणं हा अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे, अनेकांचा दिवस सिगरेटनं सुरू होतो आणि सिगरेटनं संपतो.
Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, नैसर्गिक उपाय ठरतील उपयुक्त
धूम्रपानाचे धोके लक्षात घेतले तर ही सवय का सोडावी याचं महत्त्व कळतं. कारण ते एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही तर संपूर्ण कुटुंबावर याचा परिणाम होतो.
धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी काय करता येईल ?
- आहारात बदल
- काही अन्नपदार्थांमुळे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होऊ शकते. या पदार्थांमध्ये सफरचंद, गाजराचा समावेश आहे. सफरचंद, गाजर खाताना हात आणि तोंड व्यस्त ठेवतात आणि धूम्रपान करण्याची इच्छा निर्माण होत नाही. संत्र्यामधे व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि यामुळे तंबाखूमुळे होणारं नुकसान कमी होतं.
- ओट्स आणि ब्राऊन राईसमुळे रक्तातील साखर स्थिर होते आणि तंबाखू सोडल्यामुळे होणारी जळजळ यामुळे कमी करता येते.
- बदाम आणि सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यानंही सिगरेटची इच्छा कमी होते. याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सिगरेटचा धूर वाईट वाटू लागतो.
Monsoon Diseases : पावसाळ्यातल्या या पाहुण्यांचं करु नका स्वागत, साथीच्या रोगांपासून राहा सावध
- व्यायाम - धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी शारीरिक हालचाली अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. धूम्रपान सोडताना एखाद्याला नैराश्य येतं आणि चिंता, तणाव जाणतो. यासाठी नृत्य, व्यायाम, योगा किंवा पोहणं यासारख्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली केल्यानं या समस्या कमी होऊ लागतात आणि मनालाही हळूहळू याची सवय होते.
- धूरमुक्त वातावरणात राहा -
धूम्रपान करणाऱ्यांमधे राहत असाल किंवा अशा वातावरणात राहत असाल जिथे कोणीतरी सतत धूम्रपान करत असेल, तर तंबाखू व्यसनापासून मुक्त होणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे, स्वतःसाठी धूरमुक्त क्षेत्र तयार करणं महत्वाचं आहे.
- सिगरेट पिण्याचा ट्रिगर टाळा - त्रास देणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं महत्वाचं आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. ज्यामुळे धूम्रपानाची आठवण होणार नाही आणि धूम्रपान करण्याची इच्छा होणार नाही. यासाठी, दिनक्रम बदलण्याची गरज आहे.
