सुला विनयार्ड्स
नाशिकला भारताची 'वाइन कॅपिटल' म्हणून ओळखले जाते आणि सुला विनयार्ड्स हे त्याचे केंद्र आहे. हे ठिकाण पिकनिकपेक्षा युनिक अनुभवासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही वाइन टेस्टिंग करू शकता, द्राक्षांच्या मळ्यांमध्ये फेरफटका मारू शकता आणि इटालियन-शैलीतील रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 13 किमी अंतरावर आहे.
advertisement
त्र्यंबकेश्वर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गरम्य डोंगर आणि हिरवीगार वनराई यासाठीही प्रसिद्ध आहे. येथील ब्रह्मगिरी पर्वताची भव्यता आणि आजूबाजूचे शांत वातावरण मन मोहून टाकते. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.
इगतपुरी आणि भावली धरण
नाशिकहून मुंबईकडे जाताना येणारे इगतपुरी हे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. इगतपुरीजवळील भावली धरण परिसर पिकनिकसाठी अतिशय शांत आणि आल्हाददायक आहे. धरणाचे पाणी आणि आजूबाजूचे डोंगर फोटोशूटसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. येथून विपश्यना केंद्र देखील जवळ आहे. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 45 किमी. अंतरावर आहे.
सप्तशृंगी गड
नाशिक जिल्ह्याच्या वणीजवळ असलेला सप्तशृंगी गड हे देवीचे पवित्र स्थान असून, हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. मंदिरासोबतच, गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण दऱ्यांचे आणि घाटांचे विहंगम दृश्य दिसते. येथील हवामान बहुतेक वेळा थंड आणि आल्हाददायक असते. रोप-वे असल्याने लहान मुलांसाठी हा प्रवास मनोरंजक ठरतो. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 65 किमी. अंतरावर आहे.
सोमेश्वर धबधबा
हा धबधबा नाशिक शहरात आहे. शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत दूधसागर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एकाच वेळेला निसर्गाचेही आणि देवाचेही दर्शन घेऊ शकणार आहात.
पांडव लेणी
ही लेणी पुरातन कलेचा अद्भुत असा नमुना आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे असे चित्रे कोरली आहेत. पाथर्डी गावच्या फाट्यापासून काहीच अंतरावर ही लेणी एका डोंगरावर कोरली आहे. साधारण 2 तासात तुम्ही या लेणीचे संपूर्ण चित्र पाहून पुढचा प्रवास करू शकणार आहात. या ठिकाणी तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅण्डवरून रिक्षाने सहज जाऊ शकणार आहात.
पिकनिकसाठी महत्त्वाच्या टिप्स..
वरील सर्व ठिकाणे एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम आहेत. लांबच्या प्रवासासाठी सकाळी लवकर निघणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेणे तुमच्या पिकनिकला अधिक खास बनवेल.
