थंडीपासून बचाव
थंड हवामानामुळे दातांमध्ये संवेदनशीलता वाढू शकते आणि दातांना वळ येणं काही खाल्लं किंवा प्यायल्या नंतर ठणका लागणे अशा विविध उद्भवू शकतात. शरीराला थंडी वाजू नये म्हणून आपण जसं स्वेटर किंवा उबदार कपडे घालतो तसंच दातांना थंडी वाजू नये म्हणून स्कार्फ किंवा मफलरचा वापर करून तोंडावर थंड वारा येणं टाळा.
advertisement
2वेळा ब्रश करा
त्यामुळे हिवाळ्यात दात स्वच्छ ठेवण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश करावा. हिवाळ्यात हिरड्यांना इजा होऊ नये म्हणून मऊ ब्रिसल्सचा ब्रश वापरावा.
हे सुद्धा वाचा : Oral hygiene खराब टूथब्रश बनेल हार्ट ॲटॅकचं कारण, योग्यवेळी बदला टूथब्रश
थंड आणि गरम पदार्थांवर नियंत्रण
हिवाळ्यात थंड किंवा गरम पदार्थांचा दातांवर थेट परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे अती थंड किंवा अती गरम पदार्थ खाण्याचा मोह टाळावा जेणेकरून दातांची संवेदनशीलता नियंत्रणात राहील आणि दातदुखीचा त्रास होणार नाही.
गुळण्या
कोमट पाण्यात हळद व मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे दात व हिरड्यांचे दुखणे कमी होते. जर दात दुखत असतील तर दुखऱ्या दातावर लवंग तेल लावल्याने वेदना कमी होतात.याशिवाय तुळशीची पाने चघळल्याने तोंडातील जंतू नष्ट होतात.
आहारात बदल
आहारात दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.यात असलेल्या व्हिटॅमिन डी मुळे हाडं आणि दात मजबूत व्हायला मदत होईल.