बडीशेप, दालचिनी, लवंग, ओवा, जिरं हे नेहमीच्या वापरातले मसाले जेवणाचा स्वाद तर वाढवताताच पण हे एकत्र करुन तयार केलेलं डिटॉक्स ड्रिंक रोज प्यायल्यानं, त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहिल. कंटेंट क्रिएटर अर्चिता गुप्ता यांनी इंस्टाग्राम हँडलवर याची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Hair Care : हिरवी भाजी करेल केसांवर जादू, ऋजुता दिवेकरांनी सांगितलंय सीक्रेट
advertisement
डिटॉक्स ड्रिंकसाठीचं साहित्य: - एक चमचा ओवा, एक चमचा जिरं, एक चमचा बडीशेप, दालचिनीच्या काड्या, दोन-तीन लवंगा, एक वेलची
हे सर्व साहित्य रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नैसर्गिकरित्या त्वचा चमकदार दिसावी यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक उपयुक्त आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी, भांडं झाकणानं झाकून पाच ते दहा मिनिटं उकळवा. ते एका कपमधे, गाळून घ्या. डिटॉक्स ड्रिंक तयार आहे.
Exercises : फिट राहण्यासाठी किती व्यायाम आवश्यक ? किती व्यायाम करणं योग्य ?
हे डिटॉक्स ड्रिंक दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता. ते फक्त सकाळी किंवा संध्याकाळी पिणं आवश्यक आहे असं नाही. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे रंग चमकदार होतो. त्वचेसोबतच निरोगी आरोग्यासाठीही हे डिटॉक्स ड्रिंक उपयुक्त आहे.
