अमरावती: गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष हे दोन दिवसांवर आले आहे. त्यासाठी अनेक नवीन जोडपी पारंपरिक पद्धतीने तयार होतात. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती सुद्धा आहे. त्यासाठी विविध पारंपरिक प्रकारचे कपडे हवे असतील तर अमरावतीमध्ये परवडेल अशा रेंजमध्ये कुठे खरेदी करायची? हा प्रश्न पडतोच. तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतं गांधी चौक येथील अंबा स्टोअर. याठिकाणी सर्व प्रकारचे कपडे म्हणजेच गुढीचे वस्त्र, राम दरबार ड्रेस, सोहळे आणि इतर अनेक प्रकारचे कपडे होलसेल दरात मिळतील. तसेच रेडिमेड आणि शिवून घेण्याचा पर्याय देखील इथं उपलब्ध आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पारंपरिक कपड्यांविषयी माहिती देताना निमिश दमानी सांगतात की, आमच्याकडे सर्व प्रकारचे पारंपरिक कपडे रेडिमेड सुद्धा मिळतात आणि शिवून सुद्धा मिळतात. आता गुढीपाडवा आहे तर त्यासाठी गुढीचे वस्त्र सुद्धा आले आहेत. त्याचबरोबर रामनवमीसाठी राम दरबार आणि हनुमान जयंतीसाठी सुद्धा हनुमानजीची लंगोट, दुपट्टा आणि वरील शर्ट सुद्धा आलेले आहे.
दुसऱ्याच्या हाताखाली केलं काम, पैसे जमा करून सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 1 लाख उलाढाल
180 रुपयांपासून गुढीचे वस्त्र
आमच्याकडे 180 ते 200 रुपयांपासून मिळणारे गुढीचे वस्त्र आहे. त्यात 180 चे वस्त्र हे साधे आणि सरळ आहेत. 250 ते 300 किंमत असलेले गुढीचे वस्त्र हे नववारी पॅटर्नचे आहे. त्याचबरोबर 400 रुपये किंमत असणारे वस्त्र हे डबल घेर असणारे डिझायनर वस्त्र आहेत. 180 ते 600 रुपयांपर्यंत गुढीचे सुंदर वस्त्र सर्व कलर मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे, असे निमिश सांगतात.
100 रुपयांपासून हनुमानाचा ड्रेस
हनुमान जयंती किंवा रामनवमीला घेण्यासाठी आमच्याकडे 100 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत सर्व साईजचे ड्रेसेस उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हवे असणारे सर्व कलर सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत, असेही ते सांगतात.
300 रुपयांपासून रामदरबार
राम नवमी किंवा हनुमान जयंतीला घेण्यासाठी 300 रुपयांपासून राम दरबार सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये राम लक्ष्मण आणि सीता मातेचे कपडे येतात. राम आणि लक्ष्मणसाठी धोती कुर्ता आणि दुपट्टा त्यात येतो. सीता मातेसाठी घागरा, ब्लाऊज आणि ओढणी येते. हे सर्व तुम्हाला वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कलर मध्ये 300 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत मिळते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या माळा आणि मुकुट सुद्धा इथे उपलब्ध आहेत. हे दुकान गांधी चौक येथे अंबा स्टोअर म्हणून आहे, असे निमीश सांगतात.