TRENDING:

अखेर श्रीरामांच्या दर्शनाचा योग आला! पुण्याहून अयोध्येला धावणार स्पेशल ट्रेन

Last Updated:

रेल्वे प्रशासनाकडून उन्हाळी सुट्ट्यांसाठी महाराष्ट्र ते अयोध्येदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. पुण्याहून सुटणाऱ्या या गाड्यांमधून तुमचा अयोध्येपर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायी होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी
पुण्याहून एकाच गाडीने अयोध्या गाठता येईल.
पुण्याहून एकाच गाडीने अयोध्या गाठता येईल.
advertisement

लखनऊ : अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. ना भूतो ना भविष्यति असं हे दृश्य संपूर्ण जगाने पाहिलं, त्यावेळी देशभरात दिवाळी साजरी झाली. तेव्हापासून दररोज राम मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी असते. तुम्हालासुद्धा अयोध्येत जाऊन श्रीरामांचं दर्शन घ्यायचं असेल, तर आता हा योग जुळून आलाय असं म्हणायला हरकत नाही.

advertisement

रेल्वे प्रशासनाकडून उन्हाळी सुट्ट्यांसाठी महाराष्ट्र ते अयोध्येदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. पुण्याहून सुटणाऱ्या या गाड्यांमधून तुमचा अयोध्येपर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायी होऊ शकतो.

हेही वाचा : मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट, राज्यातील या ठिकाणी पारा 43 पार, Video

उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापिका डॉ. रेखा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर फिरायला जातात. हीच बाब लक्षात घेऊन खास उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून प्रवाशांना आपल्या कुटुंबियांसोबत आरामदायी प्रवास करता यावा.

advertisement

कोणत्या स्पेशल ट्रेन धावणार?

09619 आणि 09620 उदयपूर सिटी - कोलकाता - उदयपूर ही गाडी उदयपूर शहरातून 5 मेपासून 30 जूनपर्यंत धावेल. या ट्रेनच्या 9 फेऱ्या होतील. तर कोलकाताहून 7 मेपासून 2 जुलैपर्यंत 9 फेऱ्या होतील. तसंच 04037 सहरसा जं - नवी दिल्ली या गाडीची 1 मे रोजी 1 फेरी नियोजित होती.

advertisement

हेही वाचा : विमानप्रवास फक्त 99 रुपयांत! आता आकाशात उडायचं स्वप्न दूर नाही, Details एका क्लिकवर

पुणे ते अयोध्या स्पेशल ट्रेन कोणत्या?

01455 आणि 01456 पुणे जं - अयोध्या कॅन्ट - पुणे जं ही विशेष गाडी धावेल. 3 मेपासून 7 मेपर्यंत 2 फेऱ्या होतील. तर, अयोध्या कॅन्ट जंक्शनपासून 5 मे ते 9 मेदरम्यान 2 फेऱ्या होतील. ही गाडी चिंचवड, लोणावळा, पनवेल जंक्शन, कल्याण जंक्शन, इगतपुरी, मनमाड जंक्शन, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, भोपाळ जंक्शन, बीना जंक्शन, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ असे थांबे घेऊन अयोध्या कॅन्टला पोहोचेल. त्यामुळे पुण्याहून एकाच गाडीने अयोध्या गाठता येईल.

advertisement

पूर्ण माहिती कुठे मिळेल?

नेमक्या कोणत्या वेळी या गाड्या कोणत्या स्टेशनवर थांबतील. याबाबत पूर्ण माहिती मिळवण्यासाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
अखेर श्रीरामांच्या दर्शनाचा योग आला! पुण्याहून अयोध्येला धावणार स्पेशल ट्रेन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल