मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट, राज्यातील या ठिकाणी पारा 43 पार, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
राज्यातील वाढत्या तापमानाचा विचार करता नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. भर उन्हात बाहेर जाणे टाळावे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
मुंबई: एप्रिल महिन्यात तीव्र उष्णतेने नागरिकांना हैराण केले. आता मे महिन्याची सुरुवातच उष्णतेच्या तीव्र लाटेसह होणार आहे. राज्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार जाणार आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके वाढणार आहेत. तर मुंबईतही 'हिट वेव्ह'चा तडाखा कायम असणार आहे. 1 मे रोजी राज्यातील हवामान आणि तापमान अपडेटबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईत हिट वेव्ह
राजधानी मुंबईमध्ये 30 एप्रिल रोजी 38 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईकरांना हिट वेव्हचा सामना करावा लागत आहे. 1 मेचा दिवस मुंबईकरांसाठी काहिसा दिलासादायक ठरण्याची चिन्हे आहेत. केवळ 1 अंशाने तापमानात घट होऊन ते 37 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 26 अंशांवर राहील, असं हवामान विभागानं म्हटलंय.
advertisement
पुण्याचा पारा 41 अंशांवर
पुणेकरांसाठी एप्रिल महिना उष्णतेमुळं प्रचंड त्रासदायक ठरला. आता मे महिन्यातही पुणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. 30 एप्रिल रोजी पुण्यात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. 1 मे रोजी देखील पुण्यातील तापमानाची स्थिती कायम राहणार आहे.
advertisement
विदर्भात तापमान वाढलं
विदर्भात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागपूर शहरात 30 एप्रिल रोजी 42 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. 1 मे रोजी यात एका अंशाने वाढ होऊन ते 43 अंश सेल्सीअस एवढं राहील. तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
मराठवाड्यात उष्णतेची लाट
मराठवाड्यामध्ये उन्हाचा पारा चढलेला असून तापमान 40 अंशांच्या पुढे आहे. 30 एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर 1 मे रोजी या ठिकाणी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे.
नाशिक, कोल्हापुरात पारा चढाच
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 30 एप्रिलला 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 1 मेला देखील एवढंच तापमान शहरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना देखील प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात यंदा तापमानात मोठी वाढ झाली आहे. 30 एप्रिलला कोल्हापूर मध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 1 मेला यात एका अंशांची घट होणार असून ते 39 अंश राहील.
advertisement
दरम्यान, राज्यातील वाढत्या तापमानाचा विचार करता नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. भर उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच उष्माघातापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2024 9:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट, राज्यातील या ठिकाणी पारा 43 पार, Video

