भाला, बिर्याणी अन् मांडगा, पुण्यातील शेतकऱ्याने लावलेत जगभरातील 16 प्रकारचे बांबू
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
बांबूची शेती फायद्याची ठरत असल्याने काही शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. पुण्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 16 प्रकारचे बांबू लावगले आहेत.
सध्याच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी थेट परदेशातील फळे आणि पिकांची शेती करत आहेत. आता पुण्यातील दारुंब्रेचे शेतकरी समीर वाघोले यांनी आपल्या शेतात तब्बल 16 प्रकारचे बांबू लावले आहेत. बांधकामापासून ते विणकामापर्यंत विविध उपयोग असणाऱ्या या बांबूंचा आकार आणि उंचीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
advertisement
advertisement
जायंट बर्मा हा जगातील सर्वात उंच बांबू पैकी एक आहे. फिलिपिन्स, म्यानमार या ठिकाणी हा बांबू आढळतो. त्याची उंची साधारण 100 फुटापर्यंत जाते. ऑलिव्हरी म्हणजेच भाला बांबूचं खोड सरळ वर वाढत जातं. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळी भाला बनवण्यासाठी तसेच विविध शस्त्रे बनवण्यासाठी केला जात होता. या बांबूचे लाकूड मजबूत असते, असे शेतकरी वाघोले सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement