38 वर्षीय मानसी ग्रोव्हरने इंस्टाग्रामवर खुलासा केला की, तिने तिच्या दिनचर्येत जपानी चालण्याची पद्धत समाविष्ट करून वजन कमी केले. तिने ही पद्धत देखील शेअर केली. मानसी म्हणते, 'जर तुम्हाला वाटत असेल की चालण्याने परिणाम मिळत नाहीत, तर तुम्ही जपानी वॉकिंग ट्राय केलेलं नाही. ही पद्धत तुमचे कोअर सक्रिय करते, पोश्चर सुधारते आणि सामान्य चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करते. पीसीओएस, थायरॉईड, प्रसूतीनंतरच्या महिला आणि गुडघ्यांच्या समस्या असलेल्या लोकांसाठी देखील हे परिपूर्ण आहे. ही पद्धत अतिशय सोपी आहे. रोज फक्त 10-12 मिनिटे याचा सराव करा. वेगाने चालण्याची किंवा कार्डिओची गरज नाही.
advertisement
जपानी वॉकिंग पद्धत..
3 सेकंद श्वास घ्या : नाकाने हळूहळू 3 सेकंद श्वास आत घ्या. यावेळी पाठीचा कणा सरळ ठेवा, छाती उघडी राहू द्या.
7 सेकंद श्वास सोडा : तोंडाने हळूहळू 7 सेकंद श्वास बाहेर सोडा आणि पोट हलकेच आत ओढा (कोअर टाइट करा).
लहान आणि नियंत्रित पावले : मोठी पावले टाकू नका. छोटी-छोटी, नियंत्रित पावले टाका. यामुळे पोटाचे खोलवरचे स्नायू सक्रिय होतात.
पोस्चर परफेक्ट ठेवा : छाती उघडी, खांदे रिलॅक्स, हनुवटी थोडी वर करा. फक्त हे पोस्चरदेखील कालांतराने तुमची कंबर बारीक बनवायला मदत लागते.
रोज 10-12 मिनिटे : हाच रिदम (3 सेकंद आत - 7 सेकंद बाहेर) पाळा. 2-3 आठवड्यांत कमरेच्या इंचमध्ये दिसून येणारा फरक जाणवेल.
ही पद्धत का काम करते?
- पोटाचे आतले स्नायू सक्रिय होतात.
- पोट फुगणे ब्लॉटिंग कमी होते.
- फुफ्फुसांची क्षमता वाढते.
- जास्त कॅलरी बर्न होतात.
- खालचे पोट आणि कंबरेचे चरबी कमी करण्यासाठी हे बेस्ट आहे.
- सामान्य चालण्याच्या पद्धतीत केवळ पाय काम करतात. जपानी वॉकिंग पद्धतीमध्ये संपूर्ण कोअर काम करते.
तुम्हाला क्रंचेस, प्लँक किंवा जिममध्ये जाण्याची वेळ किंवा इच्छा नसेल, तरीही पोटाची चरबी आणि एकूण वजन कमी करायचे असेल, तर ही जपानी चालण्याची पद्धत तुमच्यासाठी वरदान आहे. रोज फक्त 10-12 मिनिटे द्या. बघा कशी कंबर बारीक आणि शरीर हलके होईल. याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
