ठाणे: व्हॅलेंटाइन डे म्हटलं की आपल्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी खास गिफ्ट द्यायचं असतं. पण त्यांना नेमकं काय द्यावं हा मोठा प्रश्न असतो. तर या 'व्हॅलेंटाईन डे'ला आपण आपल्या प्रियजनांना काही वेगळं आणि हटके गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ठाण्यात अनेक खास पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक गिफ्ट शॉपीमध्ये आता खास व्हॅलेंटाइनसाठीचे गिफ्ट आले आहेत. डोंबिवलीमध्ये 'हार्ट बीट्स' नावाचं असंच एक दुकान असून इथं व्हॅलेंटाईनला गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
विविध प्रकारचे गिफ्ट
गिफ्ट शॉपीमध्ये व्हॅलेंटाइन स्पेशल प्रोडक्टचे उत्तम पर्याय पाहायला मिळतील. या दुकानात मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गिफ्ट उपलब्ध आहेत. जसं की मुलांसाठी घड्याळ, परफ्यूम, ग्रिटींग कार्ड, हातातील ब्रेसलेट तसेच कप, टाय आणि बेल्टचा बॉक्स. तर, मुलींसाठी परफ्यूम, घड्याळ, परफ्यूम, कानातले, हातातील ब्रेसलेट, बटवे आदी. एवढंच नाही तर याठिकाणी वॉलेट, टाय, पेन आणि बेल्ट यासगळ्या वस्तू असलेलं एक किटही मिळेल.
मुलींसाठी लिपस्टीक, छोटा परफ्यूम, गुलाब आणि हातातील ब्रेस्लेट अशा सगळ्या वस्तू असलेलं एक किट मिळेल. तसेच युनिसेक्स गिफ्टही पाहायला मिळतात जे खास कपलसाठीच तयार केलेले आहेत. यात कपल परफ्यूम, कपल रिंग, कपलसाठी एकाच बॉक्समध्ये घड्याळ, चॉकलेट आणि टेडी बेअर असलेला गिफ्ट बॉक्स उपलब्ध आहे. जर खास पतीसाठी गिफ्ट घ्यायचं असल्यास प्रेमाच्या चारोळ्यांची छोटीशी डायरी तसेच फोटो फ्रेम असे हजारो गिफ्टचे पर्याय या ठिकाणी आहेत.
प्रेयसी, पत्नीसाठी गिफ्टचे खास पर्याय
चॉकलेट, मेसेज बॉटल, बटवा, टेडी असलेलं एक कीट आहे. ज्याची किंमत 1 हजार रुपयांपासून सुरू होते. 200 रुपयांपासून मिळणारी चॉकलेट बॉक्स, चॉकलेट बास्केट हा सुद्धा एक पर्याय आहे.तसेच 100 रुपयांपासून मिळणारा चॉकेलट बुकेही देऊ शकता. हार्ट शेप किचेन (50 रुपये), हार्ट शेप प्रेमाचे मेसेज असलेला कप (400 रुपयांपासून), असे अनेक प्रकारचे गिफ्टचे पर्याय तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
व्हॅलेंटाईन डे साठी 50 रुपयांपासून आकर्षक गिफ्ट खरेदी करायचीय? पुण्यातील 'या' ठिकाणाला द्या भेट
प्रियकर, पतीसाठी खास गिफ्ट पर्याय
प्रियकर किंवा पतीसाठी परफ्यूम, ग्रिटिंग कार्ड, हातातील ब्रेसलेट तसेच कप, टाय आणि बेल्टचा बॉक्स किंवा किट देऊ शकता. याची किंमत 1 हजार रुपयांपासून सुरू होते. तसेच 200 रुपयांपासून परफ्युम, 400 रुपयांपासून मिळणारे हातातील गोल्डन प्लेटिंग ब्रेसलेट किंवा 60 रुपयांत मिळणारी प्रेमाचे मेसेज असलेली डायरीही भेट देऊ शकता.
दरम्यान, या व्हॅलेंटाईनसाठी गिफ्ट शॉपमधील एखादा पर्याय निवडू शकता किंवा या व्यतिरिक्त दुसऱ्या पर्यायांचाही विचार करू शकता. तसेच तुम्हाला जर स्वत:च्या हातानं काही वस्तू , ग्रिटींग कार्ड तयार करून द्यायचे असल्यास तोही गिफ्टसाठी एक उत्तम पर्याय नक्कीच असू शकतो. तसंही गिफ्ट लहान असो किंवा मोठं, दुकानातून घेतलेलं असो किंवा स्वत: तयार केलेलं त्यापेक्षा त्यामागची प्रेमाची भावना महत्त्वाची असते.





